ETV Bharat / state

प्रगतीशील शेतकऱ्याने परराज्यातील मजुरांसोबत साजरी केली दिवाळी

मध्य प्रदेशमधील मजूर कामासाठी बदनापूर येथे आले आहेत. त्यांच्या कुटुंबासोबत बदनापूर येथील शेतकरी राजेंद्र वैद्य यांनी दिवाळी सण साजरा केला. वैद्य यांनी त्या कामगारांच्या कुटुंबाला कपडे, फराळ दिले.

farmers celebrate diwali festival with other state Labor
मन मोठं असावं लागतं..! शेतकऱ्याने परराज्यातील अकुशल मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
author img

By

Published : Nov 14, 2020, 3:00 PM IST

बदनापूर (जालना) - तालुक्यातील कुसळी येथील शेतीत नवनवीन प्रयोग करून आधुनिक पध्दतीने शेती करणाऱ्या व मुरमाड जमिनीत कमी पाण्यात फळबागा फुलवणाऱ्या एका कृषी पदवीधारक तरुणाने यंदाची दिवाळी अकुशल कामगारांना कपडे, फराळ देऊन त्यांच्यासोबत साजरी करून एक स्तुत्य उपक्रम राबवला.

बदनापूरसारख्या दुष्काळी भागातील राजेंद्र वैद्य या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता शेतीत विविध प्रयोग करत चिकू, मोसंबी, सीताफळ, आंब्याची फळबाग फुलवून शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवलेला असतानाच आजची दिवाळीही अकुशल कामगारांसमवेत पारंपारिक पध्दतीने साजरी करण्याचा नवीन पायंडा पाडला.

परंपरागत शेतीला फाटा देऊन सेंद्रीय व आधुनिक शेती
बदनापूर तालुक्यातील कुसळी या गावातील राजेंद्र वैद्य हा नवतरुण बी.एस्सी. कृषीचे शिक्षण झाल्यानंतर नोकरी न करता गावी शेती करण्यासाठी आला. गावी आधी परंपरागत शेती करत असल्यामुळे अत्यल्प उत्पादन मिळत असे. पण याने शिक्षणाबरोबरच सेंद्रीय पध्दतीने आधुनिक शेती करून सध्या शेतीत विविध प्रयोग यशस्वी करत आहे.

अकुशल मजुरांद्वारे शेतीत विविध प्रयोग
राजेंद्र वैद्य याने नियोजनबध्द शेती करण्याच्या उददेशाने गाव गाठले. तरी कुशल मजुरांची अडचण होऊ लागली. त्यामुळे त्याने विविध गावातील मजुरांना कामासाठी बोलावले. मात्र या भागात मजूर मिळत नसल्यामुळे त्यांनी थेट मध्य प्रदेशमधील अकुशल मजुरांना स्वत:च्या शेतीत राहण्याची व्यवस्था करून त्या मजुरांना कृषी क्षेत्राचे ज्ञान देऊन शेती करण्यास सुरुवात केली.

सेंद्रीय व जैविक शेती
परंपरागत शेती करत असताना आधी रासायनिक खतांचा व औषधीचा वापर केला जात असायचा. पण राजेंद्रने शेती सुरू केल्यापासून जीवनामृत, लिंबोळी अर्क, जैविक खते, गांडूळ खताचा उपयोग करून शेती रसायनमुक्त केली. अतिशय मुरमाड असलेली जमीन ज्या जमीनीत खरीप पिकेही जेमतेम येत असायची. अशा ठिकाणी या तरुणाने मोसंबी, डाळींबी, सिताफळ, अंबा, चिकू अशा फळबाग फुलवून शेतीही फायदेशीर उत्पन्न्‍ देऊ शकते हे दाखवून दिले.

मशरूम उत्पादन
शेतीला पूरक व्यवसाय असावा असे या तरुणाचे मत आहे, त्यासाठी त्याने एक बंदिस्त खोली तयार केलेली असून त्या ठिकाणी तो मशरूम उत्पादनही घेतो. विशेष म्हणजे या मशरूमला आजूबाजूला मोठी मागणी आहे.

कमी पाण्यात उत्पादन वाढीसाठी विविध उपाय
बदनापूर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. सिंचनाच्या मर्यादित सुविधेमुळे बागायती पिके काढण्यासाठी शेतकरी धजावत नाही. मात्र वैद्य याने त्यावरही मात केली. सुरुवातीला शेततळे त्यांनी केले त्यानंतर फळबागांची लागवड केली. पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठिबकची व्यवस्था करण्यात आली. तर उन्हाळयात झाडाच्या बुध्याजवळ भुसा व तत्सम पदार्थ टाकल्यास ओल कायम राहून पाणीही कमी लागते.

दिवाळी केली मजुरांसोबत साजरी
या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सण आलेला असतानाही वैद्य याने ही दिवाळी आपल्या अकुशल मजुरांसोबत साजरी केली. सर्व मजुरांना व त्यांच्या कुटुंबियांना कपडे, फराळ आदी साहित्य देऊन आजची दिवाळी सकाळपासून त्यांनी या परिवारासोबत राहून साजरी करून एक नवीन पायंडा पाडला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.