ETV Bharat / state

बदनापूर नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांना लाच प्रकरणी अटक

बियर शॉपी साठी नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कर निर्धारक गणेश सुरवसे यांना 20 हजाराची लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्या प्रकरणी लाच लुचपत विभागाने मुख्य अधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांना अटक केली. न्यायलयत हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

author img

By

Published : Feb 1, 2020, 11:47 PM IST

Badanapur CO arrest i
मुख्याधिकाऱ्यांना लाच प्रकरणी अटक

बदनापूर ( जालना ) - बदनापूर नगर पंचायत मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दृलक्ष होत असल्याने अधिकारी,कर्मचारी मनमानी कारभार करीत आहेत. अनेक कामे केवळ कागदोपत्री दाखवून देयके अदा केली जात आहेत. केवळ लाच मिळाली की कामे होत असल्याच्या तक्रारी वाढत असून नगर पंचायत मधून बियर शॉपी साठी नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कर निर्धारक गणेश सुरवसे यांना 20 हजाराची लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्या प्रकरणी लाच लुचपत विभागाने मुख्य अधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांना अटक करून न्यायलयत हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला

बदनापूर ग्राम पंचायतचे 2015 मध्ये नगर पंचायतमध्ये रूपांतर झाले आणि 2017 पासून कोट्यवधींचा निधी नगर पंचायतला प्राप्त होऊ लागला. विविध विकास कामासाठी येणारा निधी काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने थातूर मातूर कामे करून गुत्तेदार लाटत आहे. नागरिकांनी तक्रारी केल्यातरी अधिकारी लक्ष देत नाही व देयके अदा केली जातात. तर वरिष्ठ पातळीवरदेखील बदनापूर नगर पंचायत कार्यालयाच्या विरोधात आलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्यामुळे नगर पंचायत मधील अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार वाढला आहे. कोणतेही प्रमाणपत्र असो की परवानगी पैसे मोजल्याशिवाय मिळत नसल्याने नागरिक वैतागले आहेत

नगर पंचायत मध्ये अधिकारी व कर्मचारयांनी मनमानी कारभार सुरू केल्याने वैतागलेल्या एका नागरिकाने थेट लाचलुचपत विभाग गाठले. बियर शॉपीच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी कर निर्धारक गणेश बाबुराव सुरवसे यांनी 35 हजाराची मागणी केली. तडजोडीअंती 20 हजार ठरल्याचे तक्रारीत नमूद केले असता 27 जानेवारी रोजी लाचलुचपत विभागाने बदनापूर नगर पंचायत मध्ये सापळा रचून 20 हजाराची लाच घेताना सुरवसे यांना रंगेहाथ धरले व अटक केली होती

आरोपी लोकसेवक गणेश बाबुराव सुरवसे यांच्याविरुद्ध लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली होती व तपास कामी एक दिवस आरोपीस पोलीस कोठडी मिळाली होती. दरम्यान चौकशीमध्ये सदर लाच घेण्यास नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांनी प्रोत्साहन दिल्याचे आढळून आल्याने 1 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत विभागाने डॉ. पल्लवी अंभोरे यांना ताब्यात घेऊन अटक केली व न्यायालय पुढे हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलिस अधीक्षक अनिता जमादार,पोलिस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संग्राम ताटे,एस एस शेख,कर्मचारी ज्ञानदेव जुंबड,मनोहर खंडागळे,राम मते,अनिल सानप,आत्माराम डोईफोळे,कृष्णा देठे, सचिन राऊत,शिवाजी जमधळे,गजानन कांबळे,गणेश चेके, खंदारे,शेख यांनी पार पाडली .

Intro:बदनापूर, दि. 1:

बदनापूर नगर पंचायत मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दृलक्ष होत असल्याने अधिकारी,कर्मचारी मनमानी कारभार करीत असून अनेक कामे केवळ कागदोपत्री दाखवून देयके अदा केली जात आहे,केवळ लाच मिळाली की कामे होत असल्याच्या तक्रारी वाढत असून नगर पंचायत मधून बियर शॉपी साठी नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कर निर्धारक गणेश सुरवसे यांना 20 हजाराची लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्या प्रकरणी लाच लुचपत विभागाने मुख्य अधिकारी डॉ पल्लवी अंभोरे यांना अटक करून न्यायलयत हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला  

   बदनापूर ग्राम पंचायत चे 2015 मध्ये नगर पंचायत मध्ये रूपांतर झाले आणि 2017 पासून कोट्यवधींचा निधी नगर पंचायत ला प्राप्त होऊ लागला,विविध विकास कामासाठी येणारा निधी काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने थातूर मातूर कामे करून गुत्तेदार लाटत आहे,नागरिकांनी तक्रारी केल्यातरी अधिकारी लक्ष देत नाही व देयके अदा केली जातात तर वरिष्ठ पातळीवर देखील बदनापूर नगर पंचायत कार्यालयाच्या विरोधात आलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्यामुळे नगर पंचायत मधील अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार वाढला असून कोणतेही प्रमाणपत्र असो की परवानगी पैसे मोजल्याशिवाय मिळत नसल्याने नागरिक वैतागले आहेत 

   नगर पंचायत मध्ये अधिकारी व कर्मचारयांनी मनमानी कारभार सुरू केल्याने वैतागलेल्या एका नागरिकाने थेट लाचलुचपत विभाग गाठले आणि बियर शॉपी च्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी कर निर्धारक गणेश बाबुराव सुरवसे यांनी 35 हजाराची मागणी केली असून तडजोडी अंती 20 हजार ठरल्याचे तक्रारीत नमूद केले असता 27 जानेवारी रोजी लाचलुचपत विभागाने बदनापूर नगर पंचायत मध्ये सापडा रचून 20 हजाराची लाच घेताना सुरवसे यांना रंगेहाथ धरले व अटक केली होती  

 आरोपी लोकसेवक गणेश बाबुराव सुरवसे यांच्याविरुद्ध लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली होती व तपास कामी एक दिवस आरोपीस पोलीस कोठळी मिळाली होती दरम्यान चौकशी मध्ये सदर लाच घेण्यास नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉ पल्लवी अंभोरे यांनी प्रोत्साहन दिल्याचे आढळून आल्याने 1 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत विभागाने डॉ पल्लवी अंभोरे यांना ताब्यात घेऊन अटक केली व न्यायालय पुढे हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलिस अधीक्षक अनिता जमादार,पोलिस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संग्राम ताटे,एस एस शेख,कर्मचारी ज्ञानदेव जुंबड,मनोहर खंडागळे,राम मते,अनिल सानप,आत्माराम डोईफोळे,कृष्णा देठे, सचिन राऊत,शिवाजी जमधळे,गजानन कांबळे,गणेश चेके, खंदारे,शेख यांनी पार पाडली Body:मुख्याधिकारी यांचा फोटोConclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.