ETV Bharat / state

शेतकऱ्यांना 'साला' म्हणणाऱ्या दानवेंना पाडणे, हेच पहिले ध्येय - बच्चू कडू - kadu

अर्जुन खोतकर यांनी एक महिना आपल्याला झुलवत ठेवल्यामुळे आम्ही गाफील राहिलो होतो. शेवटी खोतकर यांनी खासदार रावसाहेब दानवेंसोबत दिलजमाई केली, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला.

आमदार बच्चू कडू
author img

By

Published : Mar 23, 2019, 8:16 PM IST

जालना - लोकसभेची निवडणूक लढू, अथवा न लढू शेतकऱ्यांना "साला" म्हणणाऱ्या खासदार दानवेंना पाडणे, हे आपले ध्येय आहे. आपण निवडणूक लढलो नाही तरी, दानवे यांच्या विरोधातील पक्षासाठी १० दिवस प्रचार करू, असे विधान आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. याचसोबत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एक महिना आपल्याला झुलवत ठेवल्यामुळे आम्ही गाफील राहिलो होतो. शेवटी खोतकर यांनी खासदार रावसाहेब दानवेंसोबत दिलजमाई केली, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला.

आमदार बच्चू कडू

जालना लोकसभा मतदारसंघातून प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने निवडणूक लढवायची किंवा नाही याचा निर्णय येत्या २८ तारखेला आपण जाहीर करू, असे सांगून बच्चू कडू पुढे म्हणाले की, निवडणूक लढण्याचा निर्णय हा पूर्णता कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. मात्र, त्यांच्या आग्रहासाठी निवडणूक लढवून उपयोग नाही. आपले ध्येय हे खासदार दानवेंना पाडण्यासाठी आहे. त्यामुळे मी उभा राहून ते पडत असतील, तर आपण उभे राहू किंवा अन्य पक्षांच्या मदतीने त्यांना पाडणे हे आपले ध्येय राहील. मग या ध्येयासाठी आपण काँग्रेसला मदत करायची, वंचित बहुजन आघाडीला मदत करायची किंवा अन्य पक्षांना सोबत घ्यायचे, याचा निर्णय २८ तारखेला सांगू, असे ते म्हणाले.

जर आपण अन्य पक्षांना मदत केली. तर, दानवेंच्या विरोधातील प्रचाराचा नारळ हा भोकरदन येथून फुटेल आणि आपण पूर्ण दहा दिवस खासदाराच्या विरोधात प्रचार करू, असे ते म्हणाले. प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आपण लोकसभेची निवडणूक लढणार हे जाहीर केले होते. मात्र, अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून खासदार दानवे यांचा पराभव करणार, अशा प्रकारची भाषा आमच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये केली होती. त्यामुळे एक महिना आम्ही या निवडणुकीकडे लक्ष दिले नाही आणि गाफील राहिलो. मात्र, आता खोतकर यांनी माघार घेतल्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा मैदानात उतरावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले. आमदार बच्चू कडू यांनी आता आपली भूमिका पुढे ढकलली असल्यामुळे त्यांची भूमिका देखील तळ्यात मळ्यात असल्याचे दिसत आहे.

Intro:लोकसभेची निवडणूक लढूअथवा न लढू शेतकऱ्यांना "साला" म्हणणारा खासदार दानवेला पाडणे हे आपले ध्येय आहे. मग त्यासाठी आपण नाही लढलो तरी दानवे यांचे विरोधातील पक्षाला पूर्णपणे मदत करून दहा दिवस त्यांच्यासाठी प्रचार करू, असा विश्वास आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. याच सोबत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एक महिना आपल्याला झुलवत ठेवल्यामुळे आम्ही गाफील राहिलो होतो आणि शेवटी खोतकर यांनी खा.दानवे सोबत दिलजमाई केली असा आरोपही आमदार बच्चू कडू यांनी आज शनिवारी केला.

Body:जालना लोकसभा मतदारसंघातून प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने निवडणूक लढवायची किंवा नाही याचा निर्णय येत्या 28 तारखेला आपण जाहीर करू, असे सांगून बच्चू कडू पुढे म्हणाले की, निवडणूक लढण्याचा निर्णय हा पूर्णता कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. परंतु त्यांच्या आग्रहासाठी देखील निवडणूक लढवून उपयोग नाही. आपले ध्येय हे खासदार दानवेंना पाडण्यासाठी आहे त्यामुळे मी उभा राहून ते पडत असतील तर आपण उभे राहू किंवा अन्य पक्षांच्या मदतीने त्यांना पाडणे हे आपले ध्येय राहील .मग या ध्येयासाठी आपण काँग्रेसला मदत करायची वंचित बहुजन आघाडी ला मदत करायची किंवा अन्य पक्षांना सोबत घ्यायचे याचा निर्णय 28 तारखेला सांगू.
दरम्यान जर आपण अन्य पक्षांना मदत केली तर दानवे च्या विरोधातील प्रचाराचा नारळ हा भोकरदन येथून फुटेल आणि आपण पूर्ण दहा दिवस खासदाराच्या विरोधात प्रचार करू, त्याच सोबत प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आपण लोकसभेची निवडणूक लढणार हे जाहीर केले होते, मात्र अर्जुन खोतकर यांनी काँग्रेस कडून आपण निवडणूक लढवून खासदार दानवे यांचा पराभव करणार अशा प्रकारची भाषा आमच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये केल्या होत्या. त्यामुळे एक महिना आम्ही या निवडणुकीकडे लक्ष दिले नाही आणि गाफील राहिलो परंतु आता खोतकर यांनी माघार घेतल्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा मैदानात उतरावे लागणार आहे मात्र स्वतंत्र की कुणासोबत याचा निर्णय 28 तारखेला जाहीर होईल परंतु एक मात्र खरे की खोतकर यांनी एक महिना आम्हाला झुलवत ठेवल्यामुळे आम्हाला निर्णय घेण्यास वेळ लागत आहे. लोकसभेची निवडणूक शेतकऱ्यांना "साला" म्हणून हीन विणार्या खासदाराच्या विरोधात आपण लढू असे म्हणणाऱ्या आमदार बच्चू कडू यांनी आता आपली भूमिका पुढे ढकलली असल्यामुळे त्यांची भूमिका देखील तळ्यात मळ्यात असल्याचे दिसत आहे.

या बातमीचे विजवल mh_jalna_bachukdu या नावाने मोजोवरून पाठवले आहेत.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.