ETV Bharat / state

सातव्या माळेनिमित्त रेणुकामाता मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

author img

By

Published : Oct 23, 2020, 7:37 PM IST

सोमठाणा येथील शक्तीपीठ रेणुका माता मंदिरात आज सातव्या माळेनिमित्त भाविकांनी गर्दी केली होती. गडावर जाणाऱ्या पायऱ्यांवर दिवे ठेवल्यामुळे नयनरम्य दृश्य दिसत होते.

arti-in-renuka-mata-mandir-in-jalna
सातव्या माळेनिमित्त रेणुकामाता मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

बदनापूर (जालना) - तालुक्यासह संपूर्ण जालना व औरंगाबाद जिल्ह्याचे कुलदैवत असलेल्या सोमठाणा येथील शक्तीपीठ रेणुका माता मंदिरात आज सातव्या माळेनिमित्त भाविकांनी गर्दी केली होती. गडावर जाणाऱ्या पायऱ्यांवर दिवे ठेवल्यामुळे नयनरम्य दृश्य दिसत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा नसताना व मंदिर बंद असतानाही भाविकांनी मात्र पायऱ्यापर्यंत येऊन देवीचे दर्शन घेतले.

तालुक्यातील सोमठाणा येथे रेणुका मातेचे मंदिर आहे. या ठिकाणी दरवर्षी नवरात्रात नऊ दिवस मोठी यात्रा भरते, तर सप्तमीला सातव्या माळेनिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडावर यात्रा भरवण्यात आली नव्हती. तसेच मंदिरही भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले असतानाही दरवर्षीप्रमाणे संस्थानने पूजा-अर्चा व इतर दैनंदिन विधी केले. त्या अनुषंगाने आज सातव्या माळेला पहाटे चारपासून मोठ्या प्रमाणात पायी जाणाऱ्या भाविकांनी मंदिराच्या पायऱ्यापर्यंत येऊन दर्शन घेतले. तर, गडावर जाणाऱ्या प्रत्येक पायरीवर पहाटेच्या सुमारास लावलेल्या पणतींमुळे मंदिर परिसरात लखलखाट दिसत होता. देवीची सातव्या माळेनिमित्त दुपारची आरती व पूजा बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बद्री पठाडे, अनिल कोलते, दत्ता नागवे, सुरेश शिंदे, शिवाजी महाराज, जगदिश पडूळ, शिवाजी वेताळ आदींची उपस्थिती होती. यावेळी लवकरच कोरोनाचे संकट दूर होऊन सर्वत्र रोगमुक्त वातावरण होण्यासाठी आमदार कुचे यांनी देवीला साकडे घातले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.