ETV Bharat / state

Former Minister Arjun Khotkar : जालनामध्ये शिवसेनेला भगदाड; अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश? - Uddhav Thackeray

शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर ( Former Minister Arjun Khotkar ) यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve Minister of Central ) यांनी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याची राजकीय वर्तुळाच चर्चा आहे. या बातमीमुळे जालना जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील शिवसेनेला जबर धक्का पोहचला आहे.

Former Minister Arjun Khotkar
माजी मंत्री अर्जुन खोतकर
author img

By

Published : Jul 25, 2022, 1:58 PM IST

Updated : Jul 25, 2022, 3:30 PM IST

जालना : शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर ( Former Minister Arjun Khotkar ) यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या बातमीमुळे जालना जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील शिवसेनेला जबर धक्का पोहचला आहे. निष्ठावंत असल्याने खोतकर यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे उपनेतेपद बहाल केले होते. मात्र, आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खोतकर यांनी जाहीर प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

भेटीदरम्यान रावसाहेब दानवेंनी केले स्वागत : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांना पेढा भरवून त्यांचे शिंदे गटात स्वागत केले आहे. दोन दिवसांपूर्वीच खोतकर यांनी आपण ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असून शिंदे गटात कधीही जाणार नाही, असा दावा केला होता. मात्र, आज शिंदे गटात खोतकर यांनी प्रवेश केल्यास हा जिल्ह्यातील शिवसेनेला मोठा धक्का मानला जाणार आहे.

अर्जुन खोतकर यांच्यावर नुकतीच झाली होती ईडीची कारवाई : अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित जालना सहकारी साखर कारखान्यावर ईडीने फास कसला असून, कारखान्याची मालमत्ता, जमीन यंत्रसामग्री सील केली आहे. त्यामुळेच खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. तरीही अजून माजी मंत्री अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील झाले आहेत का नाही याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. तरीही सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी दिल्लीत शिंदे गटाच्या नेत्यांची भेट घेतल्याचे बोलले जाते.

नुकतीच उपनेतेपदी अर्जुन खोतकरांची झाली होती नियुक्ती : एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी खांदापालट करायला सुरुवात झाली आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशाने शिवसेना उपनेतेपदी अर्जुन खोतकर ( Arjun khotkar as shiv sena deputy leader ) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. तर पक्ष कारवाया केल्याप्रकरणी विजय नाहटा, विजय चौगुले या दोघांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ( Shiv Sena Central Office ) देण्यात आली.

अर्जुन खोतकर यांचा जमीन घोटाळा : भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्या माहितीनुसार त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्याबाबत यापूर्वी माहिती दिली आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादाने जालन्यात साखर कारखाना ( MP Arjun Khotkar involved in 100 acre scam ) विकत घेतला. सोमैय्या म्हणाले, की १०० एकर जमीन हडप करत खोतकर यांनी ( kirit somaiya on 100 acre land scam ) शेतकऱ्यांची फसवणूक केली.

100 एकर जमीनीचा घोटाळा : या जागेवर बिल्डिंग, कॉम्पलेक्स आणि मॉल बांधायचा आहे, असा आरोप सोमैय्या यांनी केला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वरदहस्तामुळेच खोतकर यांनी कारखान्याची संबंधित १०० एकर जागा गिळंकृत ( 100 acre land scam in Jalna ) केली आहे. या जागेची किंमत ४०० कोटी आहे. तर २४० एकर जमीन १ हजार कोटींची आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त तथा कायदा व सुव्यवस्था विभागाचे विश्वास नांगरे-पाटील यांच्या पत्नीचाही ( Vishwas Nangre Patils wife in scam ) यात समावेश असल्याचे सोमैय्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : Maharashtra Breaking News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

Last Updated : Jul 25, 2022, 3:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.