जालना - शहरात असलेल्या जुना जालन्यातील रेल्वेच्या उड्डाणपुलावरून एका वृद्धाने उडी मारून आत्महत्या केली. कैलास रामराव तिरुखे (50) असे त्या वृद्धाचे नाव आहे.
जालना तालुक्यातील दरेगाव येथील रहिवासी असलेले तिरुखे हे सध्या सुंदरनगर, चंदनजिरा येथे राहत होते. सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास त्यांनी उड्डाणपुलावरून रेल्वे पटरीच्या बाजूला उडी मारली, यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या खिशामध्ये शासकीय रुग्णालयात 10 तारखेला भरती केल्याचे आणि दिनांक 12 रोजी सुट्टी झाल्याची डॉक्टरांची चिठ्ठी सापडली आहे. याप्रकरणी कदीम जालना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सदर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून ते नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तर, तिरुखे यांनी आत्महत्या का केली? याचा पोलीस तपास करीत आहेत.