ETV Bharat / state

Health Minister Rajesh Tope : अफ्रिकेतील विमानांवर मुंबईत बंदी घालण्याची आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी - Africa new Corona Variant

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट ( Africa new Corona Variant ) आढळला असून आपल्या देशात याचा अद्याप रुग्ण आढळला नाही आहे. मात्र आफ्रिकेतून महाराष्ट्रात होणारी विमान वाहतूक रद्द ( Air Transport Cancellation Demand ) करा अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे मागणी केल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी जालन्यात दिली आहे.

Health Minister Rajesh Tope
राजेश टोपे
author img

By

Published : Nov 27, 2021, 5:30 PM IST

जालना - कोरोनाचा नवा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत ( Africa new Corona Variant ) आढळला असून आपल्या देशात या व्हेरियंटचा अजून एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र व्हेरियंट फारच धोकादायक असेल तर आफ्रिकेतून महाराष्ट्रात होणारी विमान वाहतूक रद्द ( Air Transport Cancellation Demand ) करा अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे मागणी केल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी जालन्यात दिली आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियम आणि अटी जाहिर केल्या आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे माहिती देताना

'केंद्राकडे विमाने बंद करण्यासाठी विनंती पत्र'

सध्या विमानतळावर बाहेरून येणाऱ्या रुग्णांचे मोनिटरींग होत असून स्वाईप टेस्टिंग आणि स्क्रिनिंग सुरू असून या व्हेरियंटपासून राज्य सरकार खबरदारी घेत असल्याचे देखील मंत्री राजेश टोपे म्हणाले. विमान प्रवासासाठी 72 तास आधीचे कोरोना टेस्टिंग प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले असून विमानतळावर कडक तपासणी केले जात असून क्वारंटाईन करण्याचा नियम करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमाने बंद करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्तांच्या पत्रासह विनंती पत्र केंद्राला पाठवण्यात आला असून केंद्राने अभ्यासपूर्ण निर्णय घ्यावा असेही राजेश टोपे म्हणाले.

1 डिसेंबरपासून राज्यांतील शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्याबाबत उद्या आरोग्य विभागांच्या अधिकाऱ्यासह इतर विभागाच्या अधिकाऱ्यानची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक होणार आहे त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे राज्यातील शाळा सुरु होण्याच्या निर्णयावर संभ्रम निर्माण झाला आहे.

मुंबईतील लोकल सर्वांसाठी खुली -

मुंबईतील लोकल ट्रेन प्रवास सर्वांना खुला ( Mumbai local open to all ) करण्याबाबत देखील टोपे यांनी महत्वाचे विधान केले असून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असेही ते म्हणाले. राज्यात लसीकरण वेगाने सुरु असल्याचे देखील टोपे यांनी स्पष्ट केले.

  • #COVID19 | Maharashtra Govt issues fresh restrictions & permissions.

    All travellers into state from any int'l destination shall be governed by directions of Govt of India in this respect. Domestic travellers shall either be fully vaccinated or carry RT-PCR test valid for 72 hrs. pic.twitter.com/rSQBik6aPQ

    — ANI (@ANI) November 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियम आणि अटी जाहिर -

आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी कोरोनाच्या नव्या व्हेरियंट नंतर नवीन नियम आणि अटी जाहिर करण्यात आल्या आहेत. यामध्ये विदेशात प्रवास करून आलेल्या प्रवाशाला संपूर्ण लसीकरण आणि 72 तासांत केलेली RT-PCR चाचणी आवश्यक असणार आहे.

हेही वाचा - Omicron Covid New Variant : मुंबईत येणाऱ्या परदेशी पर्यटकांची होणार जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी - महापौर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.