जालना - कुख्यात गुंडाच्या तावडीतून एका तीन वर्षीय बालकाला सुखरुप सोडविण्यात जालना पोलिसांना यश आले आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतून गुंडाने या मुलाचे अपहरण केले होते. या मुलाला आज त्याच्या आईवडिलांकडे सोपविण्यात आले.
पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हे शोध पथक प्रमुख पोउपनि झलवार व त्यांच्या टीमला या बालकाचा शोध घेण्याची सुचना केली. पोलीस अवघ्या एक तासाभरात हिंद नगर येथे पोहचले. तेथे तीन वर्षाचे बालक कार्तीक याने आईस पाहताच आईकडे धाव घेतली. पोलिसांनी बालकास ताब्यात घेऊन आई सविता पवार हिच्याकडे सोपवले.