ETV Bharat / state

'या' निर्णयामुळे एनडीएचे स्वप्न पाहाणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता

author img

By

Published : Dec 23, 2020, 6:32 PM IST

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र शासन यांच्या वतीने निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकात इयत्ता अकरावी व बारावीसाठी सुधारित मुल्यमापन करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक स्तरावरील पूर्वीच्या अभ्यासक्रमांमध्ये सामान्य ज्ञान विषयाचा समावेश करण्यात आला होता. प्रामुख्याने सैनिकी शाळांमध्ये हा विषय पर्यायी विषय म्हणून देण्यात आला होता. मात्र, आताच्या निर्णयानुसार सामान्य ज्ञान या विषयाला अभ्यासक्रमातून वगळण्यात आले आहे. हा निर्णय मागे घेण्याची मागणी होत आहे.

NDA entrance exam
पार्थ सैनिकी शाळा

जालना - राज्य शिक्षण विभागाने 7 नोव्हेंबरला एक परिपत्रक निर्गमित केले होते. यातील निर्णयामुळे एनडीएचे स्वप्न पाहाणाऱ्या सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे, किमान या वर्षी तरी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

माहिती देताना पार्थ सैनिकी शाळेचे प्राचार्य मोहन नेहरे

काय आहे निर्णय ?

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकात इयत्ता अकरावी व बारावीसाठी सुधारित मुल्यमापन करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व सैनिकी शाळांमधून इयत्ता अकरावी व बारावी विषय योजनेच्या मुल्यमापन योजनेची पुनर्रचना करण्यात आली आहे. उच्च माध्यमिक स्तरावरील पूर्वीच्या अभ्यासक्रमांमध्ये सामान्य ज्ञान विषयाचा समावेश करण्यात आला होता. प्रामुख्याने सैनिकी शाळांमध्ये हा विषय पर्यायी विषय म्हणून देण्यात आला होता. मात्र, आताच्या निर्णयानुसार सामान्य ज्ञान विषयाला अभ्यासक्रमातून वगळण्यात आले आहे.

हेही वाचा - केंद्रीय पथकासमोर कृषी अधीक्षकांची भांबेरी; जिल्हाधिकाऱ्यांनी सांभाळली बाजू

काय होईल परिणाम ?

राज्यात 40 सैनिकी शाळा आहेत आणि या प्रत्येक शाळांमध्ये 45 विद्यार्थी बारावीची परीक्षा देतील एवढी विद्यार्थी संख्या आहे. त्यानुसार सुमारे 1 हजार 800 विद्यार्थी महाराष्ट्रातून बारावीच्या परीक्षेसाठी पात्र ठरू शकतात. मात्र, यावर्षी कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे विद्यार्थी संख्येत घट होऊन जवळपास पंधराशे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

विषय निवडण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

या विद्यार्थ्यांना एनडीएकडे जाण्यासाठी सामान्य ज्ञान विषयाची 200 गुणांची परीक्षा असते. सैनिकी क्षेत्रातील गुणवत्ता, त्यांचे राहाणीमान, त्यांचे अधिकार, एकूणच या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा या उद्देशाने हा अभ्यासक्रम ठरवतानाच मुद्दामहून सामान्य ज्ञान विषयाचा समावेश केलेला होता. त्यानुसार अकरावीला 100 गुणांची परीक्षा आणि बारावीला १०० गुणांची परीक्षा, अशी एकूण एनडीएसाठी 200 गुणांची परीक्षा घेतली जात होती. आणि त्यामधून परिपक्व विद्यार्थ्यांची निवड केली जात होती. मात्र, आता विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान हा विषयच न ठेवल्यामुळे त्याऐवजी कोणता विषय घ्यावा, हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे? आणि त्यानंतरही अवघ्या चार ते पाच महिन्यात नवीन अभ्यासक्रम घेणे, नवीन प्राध्यापक भरती करणे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे, ही सर्व प्रक्रिया किचकट झाली आहे. त्यामुळे, एनडीएकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आले आहे.

परिपत्रक मागे घेण्याची मागणी

शासनाने या वर्षी तरी हे परिपत्रक मागे घ्यावे आणि पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान हा विषय ठेवावा, अशी मागणी मच्छोदरी शिक्षण संस्थेच्या पार्थ सैनिकी शाळेचे प्राचार्य मोहन नेहरे यांनी केली.

आरोग्य मंत्र्यांचेही पत्र

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून सामान्य ज्ञान हा विषय कायम ठेवण्यासाठी विनंती केली आहे. कारण सामान्य ज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये इतिहास, भूगोल, संगणकशास्त्र, राज्यशास्त्र व चालू घडामोडी इत्यादींचा समावेश असतो. त्यामुळे, एनडीएच्या प्रवेश परीक्षेसाठी हा अत्यंत उपयुक्त विषय असल्याचेही पत्रात नमूद आहे.

हेही वाचा - हुतात्मा गणेश गावंडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.