जालना- येथील जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आज सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत जालना तहसील कार्यालयात सुरळीत मतदान पार पडले. या केंद्रावर 77 मतदाते मतदान करणार होते. परंतु 70 मतदारांनीच आपला हक्क बजावला.
दरम्यान, 7 मतदात्यांनी मतदान न केल्यामुळे ही टक्केवारी घसरली आहे. मतदान न करणाऱ्या नगरपालिकेच्या सदस्यांमध्ये मालनबाई दाभाडे, प्रीती कोत्ताकोंडा, सुमन दादाराव हिवाळे या 4 काँग्रेसच्या महिला सदस्य आहेत. तर फारुक तुंबीवाले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असून हरीश देवावाले अपक्ष आहेत. मात्र, ते काँग्रेसचे पुरस्कृत समजले जातात. मोहम्मद नजीब या काँग्रेसच्या सदस्यांनी देखील मतदान केले नाही. एकुण सात नगरपालिका सदस्यांनी मतदान केले नाही. दुपारी चार वाजता मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर मतपेटी सील करण्यात आली.