जालना - जानेवारी महिन्यात जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम स्पष्ट झाला आहे. जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार असून, निवडणुकीत एकूण 3 हजार 997 जागांसाठी 8 हजार 70 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
हेही वाचा - इब्राहिमपूर येथे शेततळ्यात बुडून तरुणीचा मृत्यू; डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे
475 ग्रामपंचायतीत 1 हजार 232 प्रभाग असून, 8 हजार 70 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जालना तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणूक झाली आहे. एकूण 30 भागांमधून 38 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये नसडगाव, तांदुळवाडी बुद्रुक, घोडेगाव आणि तांदुळवाडी खुर्द या गावांचा समावेश आहे.
आजपासून रणधुमाळी
15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणूक आहे. आणि 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. प्रशासकीय यंत्रणा आपल्या कामाला लागली असून भावी ग्रामपंचायत सदस्य देखील आजपासून प्रचाराच्या रणधुमाळीत गुंतले आहेत. प्रत्यक्ष कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नसला, तरी गाव पातळीवर मात्र आपापले राजकीय गट सांभाळूनच ग्रामपंचायत आपल्या ताब्यात कसे राहील याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूक: चिन्ह घेण्यासाठी जालन्यात प्रचंड गर्दी