ETV Bharat / state

39 लाख रुपयांच्या थकबाकीसाठी चक्क आठ दिवसांपासून 'हे' पूर्ण गावच अंधारात - रेवगाव अंधारात

आर्थिक वर्षाच्या वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने कंबर कसली आहे.

revgaon
थकबाकीसाठी चक्क आठ दिवसांपासून 'हे' पूर्ण गावच अंधारात
author img

By

Published : Mar 16, 2020, 7:09 PM IST

Updated : Mar 16, 2020, 7:55 PM IST

जालना - आर्थिक वर्षाच्या वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने कंबर कसली आहे. थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका सर्वत्र सुरू आहे. याचा फटका जालना तालुक्यातील इस्लामवाडी, सामनगाव, पुणेगाव, पाचनवडगाव, वडिवाडी, खणेपुरी, रेवगाव या गावांना बसला आहे. यामध्ये रेवगाव हे आठ दिवसांपासून अंधारातच आहे.

39 लाख रुपयांच्या थकबाकीसाठी चक्क आठ दिवसांपासून पूर्ण गावच अंधारात

या गावची राजकीय परिस्थिती खूपच विचित्र आहे. हे गाव जालना तालुक्यात आहे. शासकीय कामे जालना तालुक्यात , आमदार मात्र तालुक्याचा नाही. येथे खासदारही परभणीचे शिवसेनेचे संजय जाधव आहेत. घनसांगीचे आमदार राजेश टोपे हे जालनाचे पालकमंत्री आहेत. तसेच जिल्हा परिषदेचा गट असलेले रेवगाव सर्कल हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य अनिरुद्ध खोतकर यांच्या गटाकडे आहे. अशा तीन दिग्गजांना हे गाव मतदान करते. मात्र, विजेसाठी या गावाला झगडावे लागत आहे. रेवगावकरांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. रडावे तर कोणाजवळ अशी त्यांची परिस्थिती आहे.

गेल्या आठ दिवसांपासून वीज बिलाच्या वसुली मोहिमेसाठी वीज वितरण कंपनीने गावचा पूर्ण विद्युत पुरवठा खंडित केलेला आहे. त्यामुळे गावामध्ये विजेवर चालणाऱ्या सर्व वस्तू बंद पडल्या आहेत. पंखा बंद, नळ बंद, टीव्ही बंद, गिरणी बंद, बांधकाम बंद , फिल्टरचे पाणी बंद आहे. याबंदमुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. पाणी भरण्यासाठी गावकऱयांना शेजारील गावात जावे लागत आहे. यासंदर्भात कुणबी युवा संघ महाराष्ट्रच्यावतीने जालनाचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटून निवेदनही दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन मंत्री टोपे यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता कैलास हुमणे यांनादेखील स्वतः लक्ष घालून वीज खंडित होणार नाही याकडे लक्ष देण्याचे सुचवले होते. मात्र, गावातून कसल्याच प्रकारची वसुली येत नसल्याचा ठपका ठेवत आजपर्यंत गावचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला नाही.

सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. तसेच कोरोना आजाराचे संकटदेखील सर्वत्र घोंगावत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, घरांमध्ये दिवे आणि पंखे नसल्यामुळे नागरिकांना झोपण्यासाठी येणाऱ्या अडचणी तसेच गिरणी बंद असल्यामुळे धान्य दळायचे कुठून ही एक मोठी अडचण गावकऱ्यांसमोर उभी आहे. वीज वितरण कंपनी आणि गावकरी दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे हा तिढा सुटायचा कसा? हा एक प्रश्न निर्माण झाला आहे.

या गावातील 352 ग्राहकांचा कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. या ग्राहकांकडे 38 लाख 35 हजार रुपये थकबाकी आहे. या गावांमध्ये अधिकृत आणि वीज मीटर सुरू असलेले सहा ग्राहक देखील पहायला मिळतात. मात्र, या ग्राहकांकडेही 1 लाख 27 हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे गावातून एक रुपयादेखील वसुली होत नसल्यामुळे हा वीज पुरवठा आता सुरू होणार कसा हा एक प्रश्न समोर आहे.

हेही वाचा -

संतापजनक! बापाकडून मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार, पीडिता गर्भवती..

जाणून घ्या, जगभरातील महत्त्वाच्या दहा घडामोडी...

Last Updated : Mar 16, 2020, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.