औरंगाबाद- कोरोनाचा विळखा औरंगाबादेत वाढत आहे. त्यातच राज्य राखीव पोलीस दलातील 72 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व जवान मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेले होते. त्यामुळे औरंगाबादच्या चिंतेत वाढ झाली आहे.
हेही वाचा- बापरे! आर्थर रोड कारागृहात 77 कैदी, 26 कर्मचाऱ्यांसह तब्बल 103 जणांना कोरोनाचा संसर्ग
दोन दिवसांपूर्वी मालेगाव येथे बंदोबस्तासाठी 96 जवान गेले होते. ते बुधवारी परतले. त्यांनतर त्यांना क्वारंटाईन केले होते. यावेळी त्यांची कोरोना चाचणी केली होती. त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला असून 72 जवानांना कोरोनो झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
काही दिवसांपूर्वी एक जवान मालेगाव येथे मास्क आणि सॅनिटायझर देण्यासाठी गेला होता. तो परत आल्यावर त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात त्या जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या 64 जणांना या आधीच कॉरंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात 90 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह झाले असून कोरोना बधितांची संख्या 468 वर पोहोचली आहे.