ETV Bharat / state

जालन्यात ५ मतदारसंघातून ५४ जणांची माघार, ७९ उमेदवार रिंगणात

जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवारांमध्ये 133 उमेदवार होते. त्यापैकी आता 79 उमेदवार राहिले आहेत.

जालन्यात ५ मतदारसंघातून ५४ जणांची माघार
author img

By

Published : Oct 7, 2019, 9:06 PM IST

जालना - जिल्ह्यामध्ये ५ विधानसभा मतदारसंघातून 54 उमेदवारांनी माघार घेतली आहे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता 79 उमेदवार राहिले आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार जालना विधानसभा मतदारसंघात असून त्यांची संख्या 32 आहे. त्यापैकी ४ महिला उमेदवार आहेत.

जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवारांमध्ये 133 उमेदवार होते. त्यापैकी आता 79 उमेदवार राहिले आहेत.

हे वाचलं का? - युतीत 'बंड'खोरांची लाट; एकमेकांविरोधात उभे 'ठाक'

मतदारसंघनिहाय माहिती -

  • मतदारसंघ वैध उमेदवार माघार घेतलेले उमेदवार रिंगणात असलेले उमेदवार
  1. परतूर 21 7 14
  2. घनसावंगी 27 14 13
  3. जालना 56 24 32
  4. बदनापूर 20 6 14
  5. भोकरदन 9 3 6

महत्त्वाच्या लढती -

  • मतदारसंघ लढत
  1. जालना शिवसेनेचे अर्जुन खोतकर विरुद्ध काँग्रेसचे कैलास गोरंट्याल
  2. परतूर भाजपचे बबनराव लोणीकर विरुद्ध काँग्रेसचे सुरेशकुमार जेथलिया
  3. भोकरदन भाजपचे संतोष दानवे विरुद्ध राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे
  4. बदनापूर भाजपचे नारायण कुचे विरुद्ध राष्ट्रवादीचे बबलू चौधरी, मनसेचे भोसले
  5. घनसावंगी राष्ट्रवादीचे राजेश टोपे विरुद्ध हिकमत उढाण

हे वाचलं का? - विधानसभा निवडणुकीत दिलेल्या पाच जागांवर आपण समाधानी - रामदास आठवले

जालना विधानसभा -
आजच्या तारखेत शासनाच्या निकषानुसार ८ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. 32 उमेदवार असल्यामुळे 3 मतदान यंत्र लागणार आहेत. पहिल्या दोन मतदान यंत्रांवर उमेदवारांची नावे आणि तिसऱ्या मतदान यंत्रावर फक्त नोटाची बटन असतील. तीन मतदान यंत्र, एक कंट्रोल युनिट आणि एक व्हीव्हीपॅट मशीन अशी यंत्रणा लागणार आहे.

Intro:जालना जिल्ह्यामध्ये पाच विधानसभा मतदारसंघातून 54 उमेदवारांनी माघार घेतली आहे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता 79 उमेदवार राहिले आहेत .त्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार जालना विधानसभा मतदारसंघात असून त्यांची 32 एवढी संख्या आहे त्यापैकी चार उमेदवार महिला आहेत.

Body:जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवारांमध्ये 133 उमेदवार होते. त्यापैकी आता 79 उमेदवार राहिले आहेत. मतदारसंघनिहाय माहिती पुढीलप्रमाणे. परतूर- वैध उमेदवार 21, माघार घेतलेली उमेदवार 7 निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार 14 घनसावनगी- 27 पैकी 14 उमेदवारांनी माघार घेतली असून 13 उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत जालना- विधानसभा मतदारसंघात 56 उमेदवार होते त्यापैकी 24 उमेदवारांनी माघार घेतली आहे .आणि आता 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत . बदनापूर- विधानसभा मतदारसंघातून 20 उमेदवारांपैकी सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे तर 14 उमेदवार आता निवडणूक लढवीत आहेत. भोकरदन- विधानसभा मतदार संघात नऊपैकी तीन उमेदवारांनी माघार घेतली आहे आणि सहा उमेदवार रिंगणात आहेत. सर्वात कमी उमेदवार असलेला भोकरदन हा एकमेव मतदारसंघ आहे. * महत्त्वाच्या लढती* *जालना- शिवसेनेचे विद्यमान राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याविरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल. * परतुर भारतीय जनता पार्टीचे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया. * भोकरदन- भारतीय जनता पार्टी चे विद्यमान आमदार संतोष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे . *बदनापूर -भारतीय जनता पार्टीचे आमदार नारायण कुचे यांना मात्र तीन उमेदवारांशी सामना करावा लागणार आहे .राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बबलू चौधरी ,शिवसेनेतून बंडखोरी करून मनसेच्या तिकिटावर उभे असलेले भोसले आणि अन्य एका शी सामना करावा लागणार आहे. * घनसावंगी मतदार संघातून पारंपारिक प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांना पुन्हा एकदा शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांचा सामना करावा लागणार आहे. * जालना विधानसभेची अशी आहे परिस्थिती* आजच्या तारखेत शासनाच्या निकषानुसार आठ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. 32 उमेदवार असल्यामुळे 3 मतदान यंत्र लागणार आहेत. पहिल्या दोन मतदान यंत्रांवर उमेदवारांची नावे आणि तिसरा मतदान यंत्रावर फक्त नोटाची बटन असतील .तीन मतदान यंत्र ,एक कंट्रोल युनिट ,आणि एक व्ही व्ही पॅट मशीन अशी यंत्रणा लागणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.