ETV Bharat / state

जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ श्रेणीसाठी ४७० शिक्षकांच्या प्रस्तावातून ५१ जणांचे प्रस्ताव मंजूर

वरिष्ठ श्रेणीसाठी एकूण ४७० प्रस्ताव आले होते. त्यापैकी सद्य परिस्थितीत १२१ शिक्षकांचे प्रस्ताव कार्यालयाच्या स्तरावर प्राथमिक पडताळणी करण्यात आली. त्यामधील ७० शिक्षकांच्या प्रस्तावात त्रुटी आढळून आल्या आहेत. तर उर्वरीत ५१ शिक्षक या श्रेणीसाठी पात्र ठरले आहेत.

जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ श्रेणीसाठी ४७० शिक्षकांच्या प्रस्तावातून ५१ जणांचे प्रस्ताव मंजूर
author img

By

Published : May 15, 2019, 8:17 PM IST

जालना - जिल्हा परिषदेअंतर्गत १२ वर्ष सेवा पूर्ण केलेले ५१ शिक्षक वरिष्ठ श्रेणासाठी पात्र ठरले आहेत. या श्रेणीसाठी एकूण ४७० प्रस्ताव आले होते. त्यापैकी सद्य परिस्थितीत १२१ शिक्षकांचे प्रस्ताव कार्यालयाच्या स्तरावर प्राथमिक पडताळणी करण्यात आली. त्यामधील ७० शिक्षकांच्या प्रस्तावात त्रुटी आढळून आल्या आहेत. तर उर्वरीत ५१ शिक्षक या श्रेणीसाठी पात्र ठरले आहेत. ही माहिती जालना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ श्रेणीसाठी ४७० शिक्षकांच्या प्रस्तावातून ५१ जणांचे प्रस्ताव मंजूर

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर यांनी १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये या विषयी प्रश्न उपस्थित केला होता. जालना जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज दुपारी दोन वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अडीच वाजेपर्यंत ही सभा सुरूच झाली नाही. या सभेला अनेक जिल्हा परिषद सदस्य देखील गैरहजर होते. त्यामुळे दुष्काळाच्या परिस्थितीत जिल्हा परिषद सदस्यांना काही गांभीर्य नसल्याचे सदस्यांच्या उपस्थितीवरून लक्षात आले.

दरम्यान, मागील सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर यांनी जिल्ह्यातील ९०० शिक्षकांची बारा वर्षे सेवा पूर्ण झाली आहे, त्यामुळे त्यांना वरिष्ठ श्रेणी लागू करावी. अशी मागणी केली होती. मात्र शिक्षण विभागाने त्यांना वरिष्ठ श्रेणी लागू केली नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यावरून आज एकूण ४७० प्रस्तावांपैकी ५१ शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी देण्याचे प्रस्तावित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. आजच्या या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्यासह जिल्ह्यातील मोजकेच जिल्हा परिषद सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Intro:जालना जिल्हा परिषदेअंतर्गत बारा वर्षे सेवा पूर्ण केल्यामुळे वरिष्ठ श्रेणी साठी पात्र असलेल्या 51 शिक्षकांच्या वरिष्ठ श्रेणी लाभासाठी मार्ग मोकळा झाला आहे .जिल्हा परिषद अंतर्गत एकूण 470 प्रस्तावांपैकी सध्या परिस्थितीत 121 शिक्षकांचे प्रस्ताव कार्यालयाच्या स्तरावर प्राथमिक पडताळणी केले. मात्र यामधील सत्तर शिक्षकांच्या प्रस्तावात काही त्रुटी आढळून आल्या आहेत. उर्वरित 51 शिक्षक हे वरिष्ठ श्रेणी साठी पात्र ठरले असल्याची माहिती आज जालना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनुपालन अहवालात देण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर यांनी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता.

Body:जालना जिल्हा परिषदेच्या कॅ. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज दिनांक 15 रोजी दुपारी दोन वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अडीच वाजेपर्यंत ही सभा सुरूच झाली नाही .अनेक जिल्हा परिषद सदस्य देखील गैरहजर होते .त्यामुळे दुष्काळाच्या परिस्थितीत जिल्हा परिषद सदस्यांना काही गांभीर्य नसल्याचे सदस्यांच्या उपस्थितीवरून लक्षात आले. दरम्यान मागील सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर यांनी जिल्ह्यातील 900 शिक्षकांनी बारा वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यामुळे त्यांना वरिष्ठ श्रेणी लागू करावी, मात्र शिक्षण विभागाने त्यांची ही वरिष्ठ श्रेणी लागू केली नसल्याचे सांगितले होते .त्यावरून आज एकूण 470 प्रस्तावांपैकी 51 शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी देण्याचे प्रस्तावित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आजच्या या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर उपाध्यक्ष सतीश टोपे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्यासह जिल्ह्यातील काही जि प सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.