ETV Bharat / state

जालन्यातील 5 नागरिक मरकजच्या कार्यक्रमात, पोलिसांसमोर शोधण्याचे आव्हान - जालन्यातील 5 नागरीक मरकजच्या कार्यक्रमात

दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजमध्ये तबलीग जमातच्या कार्यक्रमात जालना जिल्ह्यातील 5 जण सामील झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. यामध्ये घनसावंगी तालुक्यातील 3 जणांचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे.

5 people from jalna attend markaj event
जालन्यातील 5 नागरीक मरकजच्या कार्यक्रमात
author img

By

Published : Apr 1, 2020, 10:15 PM IST

जालना - दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजमध्ये तबलीग जमातच्या कार्यक्रमात जालना जिल्ह्यातील 5 जण सामील झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. यामध्ये घनसावंगी तालुक्यातील 3 जणांचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे. लोकांचा अद्याप थांगपत्ता लागला नाही. ते लोक सध्या कोठे आहेत याची माहिती मिळवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाशी निगडित असलेले आणि परतीच्या प्रवासातील एक वाहन 28 तारखेला औरंगाबादला आल्याची चर्चा सुरू असून हे पाचही जण औरंगाबादहून इतरत्र गायब झाले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, त्यापैकी दिल्लीत असलेल्या एकासोबत जालन्याहून एका व्यक्तीने मोबाईलवर संभाषण केले आहे. त्याची ध्वनीफीत व्हायरल झाली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर या पाच जणांना शोधण्याचे मोठे आव्हान आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.