ETV Bharat / state

जालना जिल्ह्यात पाच दिवसाचा आठवडा; जिल्हाधिकार्‍यांनी केली कार्यालयाची पाहणी - jalna collector office

पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल आणि पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून होते. काही महिलांचीही तारांबळ उडाली होती. मात्र, या अडचणींवर मात करत त्या वेळेवर उपस्थित होत्या. तर काही महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी पाहणी करून गेल्यानंतर कार्यालयातून लगेच काढता पाय घेतला आणि बाहेर जाऊन आपली वैयक्तिक कामे सुरू केली.

जिल्हाधिकारी कार्यालय, जालना
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना
author img

By

Published : Mar 3, 2020, 9:44 PM IST

Updated : Mar 4, 2020, 10:12 AM IST

जालना - महाविकास आघाडीच्या सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असावा, असा निर्णय पारित केला होता. जालना जिल्ह्यातही मंगळवारपासून हा निर्णय लागू झाला. दोन मार्चला स्थानिक सुटी होती. यामुळे 3 मार्चपासून या पाच दिवसांच्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात झाली.

शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा; जालन्यात जिल्हाधिकार्‍यांनी केली कार्यालयाची पाहणी

पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल आणि पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून होते. काही महिलांचीही तारांबळ उडाली होती. मात्र, या अडचणींवर मात करत त्या वेळेवर उपस्थित होत्या. तर काही महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी पाहणी करून गेल्यानंतर कार्यालयातून लगेच काढता पाय घेतला आणि बाहेर जाऊन आपली वैयक्तिक कामे सुरू केली.

हेही वाचा - समाजाची मानसिकता का बदलतेय ? अहमदनगरच्या 'त्या' घटनेचा आमदार भारती लव्हेकरांकडून निषेध

मंगळवारी पहिल्यांदाच नऊ वाजून 45 मिनिटांनी शासकीय कार्यालयांना सुरुवात होणार होती. त्यानुसार जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी 9 वाजून पन्नास मिनिटांनी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी नऊ वाजून 45 मिनिटांनी आपापल्या कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर या दोघांनीही पुरवठा विभाग, महसूल विभाग आणि अन्य विभागांची पाहणी केली.

यादरम्यान, त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती बस्सये यांचीही चौकशी केली. मात्र, त्या सव्वा दहा वाजेपर्यंत आल्याच नव्हत्या. याबरोरच जालना तहसीलमध्ये देखील मंगळवारी वेळेवर कामकाजाला सुरुवात झाली. तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी नेहमीप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांचा कामाचा आढावा यांनी घेतला आणि दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाल्यामुळे फिरत्या पथकालाही योग्य त्या सूचना दिल्या.

Last Updated : Mar 4, 2020, 10:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.