जालना - जिल्ह्यामध्ये शनिवारी रात्रीत ४२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. या रुग्णांपैकी ४० रुग्ण हे जालना शहरातील आहेत. तर उर्वरित दोन रुग्ण जालना तालुक्यातील पानशेंद्राचा एक आणि जाफराबाद तालुक्यातील भारज येथील एक आहे. या नव्या रुग्णांसह जालना जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५०४ वर पोहोचली आहे.
जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आज ४२ नवे रुग्ण आढळून आले. यात जालना शहरातील ४० जण आहेत. त्यामध्ये दाणाबाजार १०, रहमान गल्ली १०, खडकपुरा ५, मंगळ बाजार २ आणि अन्य काही भागातील रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण ५०४ रुग्णांपैकी १३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १३ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, अनलॉक १ ची घोषणा करण्यात आल्याने, जालना शहरात नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होईल, अशी भीती व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा - धक्कादायक; स्वयंपाकघरात पडला 15 फूट खोल खड्डा, परिसरात चर्चांना उधाण
हेही वाचा - नानेगावातील तात्पुरता पूल दुसऱ्यांदा वाहून गेला; मुसळधार पावसाने वाहतूक ठप्प