ETV Bharat / state

जालन्यात चारा छावणीचे २३ लाख रुपये शासनाकडे थकले; चाऱ्याअभावी ४ जनावरांचा मृत्यू

छावणीचे तब्बल २३ लाख रुपये शासनाकडे थकलेले आहेत. यासंदर्भातील बिले शासनाकडे जमा करूनही शासनाने पैसे न दिल्याने गेल्या ३ दिवसांपासून चारापाणी नाही. त्यामुळे ३ वासरे आणि एक म्हैस दगावली आहे. परिणामी शेतकरी तिव्र संताप व्यक्त करीत आहेत.

चाराछावणीतील गुरेढोरे
author img

By

Published : Jun 1, 2019, 10:14 AM IST

Updated : Jun 1, 2019, 10:39 AM IST

जालना - जिल्ह्यातील अंबड चारा छावणीमध्ये चारा आणि पाण्याअभावी ४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३ वासरे आणि एक म्हैस दगावली आहे. चारा छावण्यांचे देयके शासनाकडे थकल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी चारा छावण्यांबाबत जालना जिल्हाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी गडबडीने चारा छावण्यांना मंजुरी दिली. त्यानंतर घाईगडबडीत चारा छावण्या उभारण्यात आल्या. त्यामधून अंबड येथे गेल्या ४ मे रोजी राष्ट्रमाता जिजाऊ सहकारी संस्थेने चारा छावणी सुरू केली आहे. विनोद भागुजी खले हे ही चारा छावणी चालवतात. या छावणीचे तब्बल २३ लाख रुपये शासनाकडे थकलेले आहेत. यासंदर्भातील बिले शासनाकडे जमा करूनही शासनाने पैसे न दिल्याने गेल्या ३ दिवसांपासून चारापाणी नाही. त्यामुळे ३ वासरे आणि एक म्हैस दगावली आहे. परिणामी शेतकरी तिव्र संताप व्यक्त करीत आहेत.

शेतकरी अंबडच्या तहसील कार्यालयात तक्रार करण्यासाठी गेले होते. मात्र, अंबडच्या तहसीलदार मनिषा मेने यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकरी तहसील कार्यालयातच ठाण मांडून बसले होते.

Intro:देयक थकले; चारा छावणीतच चारा पाण्याअभावी4 जनावरांचा मृत्यू
जालना जिल्हाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर गडबडीने चारा छावण्यांना मंजुरी देण्यात. अगोदरच उशीर झाला असताना घाईगडबडीत दिलेल्या मंजुरीनंतर सदरील चारा छावण्यांचे देयके थकल्यामुळे जनावरांच्या चारा- पाण्या प्रश्न बिकट झाला आणि यामधूनच काल अंबड येथे चार जनावरांचा मृत्यू झाला. अंबड येथील राष्ट्रमाता जिजाऊ सहकारी संस्थेने ही चाराक छावणी सुरू केली आहे. विनोद भागुजी खले हेच हे ही चारा छावणी चालवतात .शासनाने पैसे न दिल्यामुळे तीन दिवसांपासून चारापाणी नाही. त्यामुळे तीन वासरे आणि एक मैस दगावली आहे. हा गंभीर प्रकार तहसीलदारांना सांगितल्यानंतरही तहसीलदार मनीषा मेने यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केलेआहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे .चार मे पासून सुरू झालेली या चारा छावणीचे 23 लाख रुपये शासनाकडे थकले आहेत .आणि या संदर्भातील सर्व बिले शासनाकडे जमा करूनही देयके न मिळाल्याने यापुढे आता चारा छावणीचा खर्च करणे कठीण झाले असल्याचेही विनोद खले यांनी सांगितले.
यासंदर्भात तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांनी अंबडचे तहसील कार्यालय गाठले. मात्र अंबडच्या तहसीलदार मनिषा मेने यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही. शेतकऱ्यांनाही वेठीस धरले त्यामुळे या शेतकऱ्यांनी तयातच ठाण मांडले होते.Body:सोबत fotoConclusion:
Last Updated : Jun 1, 2019, 10:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.