ETV Bharat / state

Jambasamarth Idol Theft Case : जांब समर्थ येथील राम मंदिर मूर्ती चोरी प्रकरणी तिघांना अटक, पाच मूर्ती ताब्यात - Jambasamarth Ram Temple Idol Theft Case

जालना जिल्ह्यातील जांब समर्थ गावातील (Jambasamarth Ram temple idol theft case) राम मंदिरातील मूर्ती चोरी प्रकरणात (Jamb Samarth idol theft case) आणखी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अटकेतील आरोपींची संख्या चारपर्यंत (4 accused jailed Jam Samarth Ram Temple Theft) पोहोचली असून इतर एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्यालाही लवकरच पकडले जाईल अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे. (Latest Update Jam Samarth Ram Temple Theft case) (Jalna News)

राम मंदिरातून मूर्ती चोरणाऱ्याला अटक
राम मंदिरातून मूर्ती चोरणाऱ्याला अटक
author img

By

Published : Oct 29, 2022, 4:44 PM IST

जालना : जिल्ह्यातील जांब समर्थ गावातील (Jambasamarth Ram temple idol theft case) राम मंदिरातील मूर्ती चोरी प्रकरणात (Jamb Samarth idol theft case) आणखी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अटकेतील आरोपींची संख्या चारपर्यंत (4 accused jailed Jam Samarth Ram Temple Theft) पोहोचली असून इतर एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्यालाही लवकरच पकडले जाईल अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपींकडून काही मूर्त्याही हस्तगत (Jambasamarth stolen idols seized) करण्यात आल्या आहेत. प्रदीर्घ काळानंतर मूर्ती चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या जालना पथकास मोठे यश आले आहे. (Latest Update Jam Samarth Ram Temple Theft case) (Jalna News)

राम मंदिरातून मूर्ती चोरणाऱ्याला अटक

तपासाला आला वेग - घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ गावातील रामदास स्वामी यांच्या पूर्वजांनी पंचधातूच्या अतिप्राचीन अशा प्रभू श्रीरामचंद्राच्या आणि हनुमान, सीता, भरत शत्रुघ्न, आदींच्या १३ मूर्ती गेल्या दोन महिन्यांपूर्वी पासून चोरी गेल्या होत्या. या प्राचीन मूर्तीचा कुठल्याच प्रकारे ठावठिकाणा लागत नव्हता. भविकांकडून या मूर्ती चोरी प्रकरणाचा छडा लागावा म्हणून आंदोलन देखील करण्यात आले होते. काल दोन आरोपींना पकडून त्यांच्या कडून पंचायतन मूर्ती जप्त केली असून त्याची माहिती काल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांनी दिली होती. त्याच वेळी आम्ही मुख्य आरोपीच्या मागावर असून त्याला पकडून आणण्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला होता. त्यामुळे या तपासला वेग आला असून त्याच्या ताब्यातून काही मूर्त्या जप्त केल्याचे सांगितले आहे.

काल दोघांना केली होती अटक - जालन्यातील जांब समर्थ येथील मूर्ती चोरी प्रकरणी जालना पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी काल दोन आरोपींना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या राम पंचायतनच्या पाच मूर्त्या जप्त करण्यात आल्या होत्या. जालन्यातील जांब समर्थ येथील राम मंदिर गेल्या दोन महिन्यांपासून मूर्तीविना होते. कारण दोन महिन्यांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी थेट देवाच्या मूर्त्याच चोरल्या होत्या.

आणखी सहा मूर्त्यांच्या शोध सुरू - काही केल्या चोरटे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर तांत्रिक अभ्यास करून पोलिसांनी या चोरी प्रकरणाचा उलगडा केला आहे. पोलिसांनी मूळच्या कर्नाटकमधील पण सध्या उस्मानाबादच्या रामनगरमध्ये राहणार्‍या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. शेख राजू आणि महादेव चौधरी अशी दोन आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून राम पंचायतन अर्थात महत्त्वाच्या पाच मूर्त्या देखील जप्त केल्या. तर आणखी ६ मूर्त्या पोलिसांच्या हाती लागणे बाकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.