ETV Bharat / state

ऐन पोळ्याच्या दिवशी विजेच्या धक्क्याने बैलजोडी दगावली; मापेगाव येथील घटना - विजेची तयार तुटून बैलजोडी ठार

परतूर तालुक्यातील मापेगाव खुर्द येथील शेतकरी प्रकाश नन्हेर असेच आपले बैल सजवून मंदिराकडे जाण्यासाठी निघाले होते. घरासमोरील विजेची तार तुटून त्यांच्या बैलजोडीवर पडली.

ऐन पोळ्याच्या दिवशी विजेच्या धक्क्याने बैलजोडी दगावली
author img

By

Published : Aug 30, 2019, 10:21 PM IST

Updated : Aug 30, 2019, 11:07 PM IST

जालना - शेतकऱ्यांचा जिवाभावाचा सण म्हणजे पोळा. या दिवशी बळीराजा आपल्या लाडक्या बैलांना कौतुकाने मिरवतो. परतूर तालुक्यातील मापेगाव खुर्द येथील शेतकरी प्रकाश नन्हेर असेच आपले बैल सजवून मंदिराकडे जाण्यासाठी निघाले होते. घरासमोरील विजेची तार तुटून त्यांच्या बैलजोडीवर पडली. विजेच्या धक्क्याने ही बैलजोडी दगावल्याची घटना पोळ्याच्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली.

ऐन पोळ्याच्या दिवशी विजेच्या धक्क्याने बैलजोडी दगावली; मापेगाव येथील घटना

या घटनेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर गावातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पंचनामा करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.दरम्यान जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित घनवट यांनी नूकसानग्रस्त शेतकऱ्याला 5 हजार रुपयांची रोख मदत केली आहे.

Intro:Body:

[8/30, 9:35 PM] Dilip Pohnerkar, Jalna: मापेगाव खुर्द ता परतूर येथील शेतकरी प्रकाश बुधाजी नन्हेर  यांच्या बैलावर महावितरण ची  तार तुटुन आगावर पडल्याने दोन्ही बैल दगावल्याची घटना घडली

[8/30, 9:37 PM] Dilip Pohnerkar, Jalna: विजेची तयार तुटून बैलजोडी ठार

मापेगाव येथील घटना

परतूर तालुक्यातील मापेगाव खुर्द येथील शेतकरी प्रकाश नन्हेर आपले बैल सजवून मंदिराकडे जाण्यासाठी अगोदर घरासमोरील खांबावरील तार तुटून बैलजोडी दगावल्याची घटना पोळ्याच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली

यामुळे गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

या घटनेमुळे गावातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी आले व घटनास्थळी पंचनामा करून वीजपुरवठा सुरळीत केला.

दरम्यान जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित घनवट यांनी शेतकऱ्याला 5 हजार रुपयांची रोख मदत केली आहे.

Conclusion:
Last Updated : Aug 30, 2019, 11:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.