जालना - दुष्काळामुळे जाफराबाद तालुका वगळता अन्य सात तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या छावण्यांवर 31 मे पर्यंत शासनाने 2 कोटी 28 लाख 35506 रुपये खर्च केला आहे. हा निधी संबंधित तहसीलदारांकडे वळताही करण्यात आला आहे. दरम्यान 30 जूनपर्यंत या चारा छावण्या सुरू राहणार आहेत. या महिन्यात सुमारे 1 कोटी खर्च वाढण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जालना जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी झाडाझडती घेतली. त्यानंतर घाई गडबडीत ४६ चारा छावण्यांना परवानगी देण्यात आली. त्यापैकी बत्तीस चाराछावण्या सुरू झाल्या. या बत्तीस चारा छावण्यांच्या माध्यमातून 18 हजार 165 मोठी जनावरे तर 3198 लहान जनावरे अशी एकूण 21 हजार 363 जनावरे या चारा छावण्यांमध्ये आहेत. जनावरांच्या प्रतवारीनुसार शासनाने या जनावरांच्या चारा पाण्याच्या व्यवस्थेसाठी चारा छावण्यांवर 2 कोटी 28 लाख 35506 रुपये खर्च केला आहे. यामध्ये सर्वाधिक खर्च अंबड तालुक्यावर झाला असून 1 कोटी 1 लाख 80007 रुपये तर सर्वात कमी खर्च परतूर तालुक्यावर म्हणजेच 3 लाख 56 हजार 666 रुपये झाला आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये जालना 56 लाख 12877, बदनापूर 11 लाख 86 हजार 554, भोकरदन 18 लाख 78550, मंठा 4 लाख 43 हजार 190 रुपये झाला आहे.
चारा छावणीत असलेल्या जनावरांची एकूण संख्या
जालना 4902, बदनापूर 1266 , भोकरदन 3420, परतुर 423, मंठा 590, अंबड 1637, घनसावंगी 2125, एकूण 21, 363 जनावरे आहेत.