भोकरदन (जालना) - तालुक्यातील वालसावंगी येथील विविध भागांतील तब्बल 13 रोहित्र अनेक महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने इतर कार्यान्वित असलेल्या रोहित्रावर वीजभार वाढला आहे. यामुळे रोहित्र पेट घेण्याच्या घटना वाढल्या आहेत.
रोहित्र पेट घेऊन स्फोट झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. आता त्याच पध्दतीने इतर रोहित्र दिवसा, रात्री कधीही पेट घेत आहे. विशेष म्हणजे 100 केव्हीचे रोहित्र सुद्धा पेट घेत असल्याने बाजूला राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. रोहित्राचा स्फोट झाल्यास जीवाला धोका पोहचवू शकतो. त्यात गावात विजेचा लपंडावही मोठा वाढला आहे. विजेची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
हेही वाचा - जालना : व्यापारी संकुलाच्या गैरव्यवहाराची चौकशी करा; विभागीय आयुक्तांकडे तक्रार
नागरिकांची मागणी -
तर दुसरीकडे, वीज वितरण विभाग मात्र रोहित्राची समस्या सोडवण्यास उत्सुक दिसत नाही. येणारा काळ हा सणासुदीचा असल्याने तत्काळ गावाला सर्वच्या सर्व नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.