जालना - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सरकारने लॉकडाऊन 5 जारी केला आहे. तसेच संचारबंदीही लागू केली आहे. असे असतानाही अनेक नागरिक विनाकारण फिरण्यासाठी बाहेर येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशा 110 दुचाकीस्वारांवर कारवाई करीत या दुचाकी जप्त केल्या आहेत.
लॉकडाऊन 5 मध्ये सरकारने काही प्रमाणात सूट दिली आहे. मात्र, लॉकडाऊन कायम आहे. त्यामुळे घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. मात्र, काही उपद्रवी विनाकारण फिरत असल्याने त्यांच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
जालन्यातील विविध चौकांमध्ये दुचाकीस्वारांवर कारवाई करत पोलिसांनी 32 दुचाकी जप्त केल्या आहेत. तर अंबड चौफुली पोलिसांनी 33 दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच जालना भागातील मामा चौकांमध्ये पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी 45 दुचाकी जप्त केल्या आहेत.