जालना - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच कोरोनामुळे बळी जाणार्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. शनिवारी सकाळी घनसांवगी तालुक्यातील पांगरा येथील 65 वर्षीय महिलेचा कोरोनाने कोविड-19 रुग्णालयात बळी गेला. तर, शुक्रवारी रात्री उशिरा 11 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आता रुग्णांची संख्या 185 झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली होती. त्याचे फलित चांगले प्राप्त झाले होते. मात्र, टाळेबंदीतून सूट मिळाल्यानंतर मुंबई आणि पुण्यातील कामगार आपापल्या गावी परतू लागले. यातूनच कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत गेला. घनसांवगी तालुक्यातील पांगरा गावातील वृद्ध महिला या आजाराला बळी पडली आहे. ही महिलादेखील काही दिवसापूर्वी मुंबईहून परतली होती. या महिलेला रक्तदाब, मधुमेह असे अन्य आजारही होते. तिला काही दिवसांपूर्वी जालन्यातील कोविड-19 रुग्णालयात निगराणीखाली ठेवले होते. आज या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. त्यासोबत 11 रुग्णांची वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाचा चौथा बळी; 11 रुग्ण वाढले, एकूण संख्या 185 वर
जालन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच कोरोनामुळे बळी जाणार्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. शनिवारी घनसांवगी तालुक्यात 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर, शुक्रवारी रात्री उशिरा 11 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आता रुग्णांची संख्या 185 झाली आहे.