ETV Bharat / state

भोकरदन तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ११ शेळ्या ठार

भोकरदन तालुक्यातील मौजे देहेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात ११ शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्याचे दीड लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे समजले.

Leopard attack goats died Mauje Dehed
बिबट्या हल्ला शेळी ठार मौजे देहेड
author img

By

Published : Jan 30, 2021, 8:04 PM IST

जालना - भोकरदन तालुक्यातील मौजे देहेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात ११ शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्याचे दीड लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे समजले.

मृत शेळ्या

हेही वाचा - नियोजनाअभावी जिल्हा परिषदेचा निधी परत जाण्याची शक्यता

मौजे देहेड येथील सुगंधाबाई बावस्कर यांच्या शेतातील गोठ्यात शेळ्या बांधलेल्या होत्या. या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यात 11 शेळ्या ठार झाल्या. सुगंधाबाई यांचा मुलगा शेतात आल्यानंतर त्याला हा प्रकार कळताच त्याने याबाबत गावात सांगितले. त्यानंतर सुरंगळी सजाचे तलाठी व वनविभागाचे जी.एम. शिनगारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. या घटनेत सुगंधाबाई बावस्कर यांचे जवळपास दीड लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे समजले.

दरम्यान, भोकरदन तालुक्यात देहेड येथील शिवारात बिबट्याने दहशत निर्माण केली असल्याने नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा - यश मिळवण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवून सोशल मीडियाचा वापर कमी करा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.