ETV Bharat / state

'जैश'चे जळगाव कनेक्शन ?; तरुणाच्या धक्कादायक फेसबुक पोस्टने खळबळ

जळगावातील तरुणाने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट अपलोड करुन जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याची माहिती दिली. देशातील ५ शहरात बॉम्बस्फोट करणार असल्याची माहितीही त्याने पोस्टमध्ये नमूद केली आहे. त्यामुळे तपास यंत्रणा तपास करत आहेत. ही पोस्ट त्या तरुणानेच अपलोड केली, किंवा त्याचे अकाउंट हॅक करुन दुसरे कोणी ही पोस्ट केली याचा तपास करण्यात येत आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 22, 2019, 10:08 PM IST

Updated : May 23, 2019, 3:27 AM IST

जळगाव - मोबाईल रिचार्जच्या नावाखाली नागरिकांकडून ५ कोटी रुपये उकळून पोबारा केलेल्या तरुणाच्या फेसबुक पोस्टने खळबळ उडाली. आपण जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून देशातील ५ शहरात बॉम्बस्फोट करण्याचे नियोजन केल्याचे या तरुणाने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे. समीर शेख उर्फ राजा भाई उर्फ मोहम्मद कलीमोद्दीन खान असे त्या तरुणाचे नाव असून तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत.

fb
तरुमाने केलेली फेसबुक पोस्ट

समीर शेख उर्फ राजा भाई उर्फ मोहम्मद कलीमोद्दीन खान (वय ३७, रा. रामनगर) मोबाईलचे काम कारयचा. त्याच्याविरोधात १० जानेवारीला २०१९ ला अमान इरफान अन्सारी या तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. समीरने मोबाईल रिचार्ज करण्याची वेबसाईट तयार करुन देण्याच्या नावाने तीन वेळा करुन ३४ लाख ९० हजार ६४८ रुपये घेतले. त्या मोबदल्यात वेबसाईट तयार करुन न देता फसवणूक करुन तो बेपत्ता झाल्याचे अमानने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या गुन्ह्यात सायबर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

समीरने 'अतीया रिचार्ज' या नावाने तयार केलेल्या फेसबुक अकाउंटच्या वॉलवर बुधवारी सकाळी आक्षेपार्ह मजकूर पोस्ट झाला. यात समीरने म्हटले आहे, की मी गेल्या काही वर्षांपासून जैश ए मोहम्मद या संघटनेचा सदस्य आहे. आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी काम करतोय. आम्ही देशातील पाच मोठ्या शहरांमध्ये सुसाईड बॉम्ब व दारुगोळा पाठवला आहे. पुलवामामध्ये झालेला प्रकार फक्त नमुना होता. पंतप्रधान यांच्यावर देखील हल्ला करणार आहोत. अशा आशयाचा मजकूर त्याच्या फेसबुक वॉलवर पोस्ट झालेला आहे. दरम्यान, या संदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी सुरक्षा यंत्रणांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, हा प्रकार संवेदनशील असल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.

दरम्यान, 'अतीया रिचार्ज' या नावाने तयार केलेल्या फेसबुक अकाउंटच्या वॉलवरून पोस्ट केलेल्या मजकुराचे स्क्रीनशॉट समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण नेमका हा काय प्रकार आहे ? अशी विचारणा करत आहे.

Intro:जळगाव
मोबाईल रिचार्जच्या नावाने शहरातील अनेक लोकांकडून सुमारे पाच कोटी रुपये गोळा करुन पोबारा केलेल्या एका तरुणाने बुधवारी सकाळी स्वत:च्या फेसबुक वॉलवर एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. आपण 'जैश ए मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून लवकरच भारतातील पाच मोठ्या शहरांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचे नियोजन असल्याचे त्याने वॉलवर पोस्ट केलेल्या मजकुरात लिहिले आहे. यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून तपासयंत्रणा त्याच्या शोधासाठी कामाला लागल्या आहेेत. दरम्यान, ही पोस्ट त्यानेच लिहिली आहे? की दुसऱ्या कोणी त्याचे अकाउंट हॅक केले आहे का? याचाही तपास सायबर पोलीस घेत आहेत.Body:समीर शेख उर्फ राजा भाई उर्फ मोहम्मद कलीमोद्दीन खान (वय ३७, रा. रामनगर) असे या तरुणाचे नाव आहे. १० जानेवारी २०१९ रोजी अमान इरफान अन्सारी (वय २०, रा. फातेमानगर) या तरुणाने समीर शेख याच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीर याने मोबाईल रिचार्ज करण्याची वेबसाईट तयार करुन देण्याच्या नावाने तीन वेळा करुन एकूण ३४ लाख ९० हजार ६४८ रुपये घेतले. त्या मोबदल्यात वेबसाईट तयार न करुन देता फसवणूक करुन तो बेपत्ता झाला असल्याचे अमान याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्यात सायबर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, समीरने 'अतीया रिचार्ज' या नावाने तयार केलेल्या फेसबुक अकाउंटच्या वॉलवर बुधवारी सकाळी आक्षेपार्ह मजकुर पोस्ट झाला. यात समीर याने म्हटले आहे की, मी गेल्या काही वर्षांपासून जैश ए मोहम्मद या संघटनेचा सदस्य आहे. आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी काम करतोय. आम्ही देशातील पाच मोठ्या शहरांमध्ये सुसाईड बॉम्ब व दारुगोळा पाठवला आहे. पुलवामामध्ये झालेला प्रकार फक्त नमुना होता. पंतप्रधान यांच्यावर देखील हल्ला करणार आहेत. अशा आशयाचा मजकुर त्याच्या फेसबुक वॉलवर पोस्ट झालेला आहे. दरम्यान, या संदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी सुरक्षायंत्रणांची बैठक घेऊन सुचना दिल्या आहेत. त्यानुसार तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, हा प्रकार संवेदनशील असल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.Conclusion:पोस्टचे स्क्रीनशॉट झाले व्हायरल!

दरम्यान, 'अतीया रिचार्ज' या नावाने तयार केलेल्या फेसबुक अकाउंटच्या वॉलवरून पोस्ट केलेल्या मजकुराचे स्क्रीनशॉट समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण नेमका काय प्रकार आहे? अशी विचारणा एकमेकांना करत आहे.
Last Updated : May 23, 2019, 3:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.