ETV Bharat / state

'शाह-शेहनशाह' हीच खरी 'तुकडे-तुकडे' गँग; योगेंद्र यादवांची सत्ताधाऱ्यांवर टीका - yogendra yadav in jalgaon

भारतीय संविधान बचाव नागरी कृती समितीच्या वतीने अमळनेर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत प्रमुख वक्ते म्हणून योगेंद्र यादव यांनी उपस्थिती लावली. यावेळी सरकार देशद्रोह करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

yogendra yadav in jalgaon
भारतीय संविधान बचाव नागरी कृती समितीच्या वतीने अमळनेर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले
author img

By

Published : Feb 8, 2020, 4:14 PM IST

जळगाव - काही लोक देशात फूट पाडण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी केला आहे. अशा लोकांकडे सत्ता आहे. तसेच प्रसारमाध्यमांची सूत्रे देखील आहेत, असे ते म्हणाले. मात्र, आपल्याकडे देशाची माती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानच नाही तर महात्मा गांधीजींनी दिलेला अहिंसेचा वारसाही असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय संविधान बचाव नागरी कृती समितीच्या वतीने अमळनेर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले

भारतीय संविधान बचाव नागरी कृती समितीच्या वतीने अमळनेर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत प्रमुख वक्ते म्हणून योगेंद्र यादव यांनी उपस्थिती लावली. यावेळी सरकार देशद्रोह करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मोदी-शाह हीच खरी तुकडे तुकडे गँग असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे. आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे हे या सभेला हजर होते.

दरम्यान, या सभेला विद्यार्थी नेता उमर खालिद तसेच गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी उपस्थित राहणार होते. परंतु, जळगाव जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत त्यांना सभेला उपस्थित राहण्याची परवानगी नाकारण्यात आली. यावर बोलताना, परवानगी नाकारणे हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेशात या प्रकारचा विरोध अपेक्षित असतो; परंतु, महाराष्ट्रात असा विरोध होणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

भाषणादरम्यान योगेंद्र यादव त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. या लोकांच्या पूर्वजांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले नसल्याचे ते म्हणाले. पुढे बोलताना, भगतसिंग यांनी एकही माफीनामा दिला नाही. मात्र, अंदमानातून हे माफीनामे लिहून पाठवत होते, असा टोला त्यांनी लगावला. सीएए आणि एनआरसी संदर्भात यादव यांनी विवेकानंद स्वामींचा उल्लेख केला. भारताने कधीही शर्णार्थींना जात व धर्म विचारला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

22 फेब्रुवारीपासून देशभर जनजागृती

मोदीजी खोटं खूप चांगलं बोलतात. एनपीआरसाठी जेव्हा कोणी तुमच्या घरी येईल तेव्हाच त्याला विरोध करा, अन्यथा पुढे जाऊन संकट वाढेल. महात्मा गांधीजींनी सांगितले आहे की अन्यायपूर्वक असलेल्या कायद्याला कडाडून विरोध केला पाहिजे. आज देशभर सीएए कायद्याला विरोध सुरू आहे. आता सर्वांनी मिळून त्याला विरोध करण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने देखील या कायद्याला विरोध केला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने जनगणना आणि एनपीआर या दोन्ही बाबी वेगवेगळ्या पद्धतीने हाताळल्या पाहिजेत.

22 फेब्रुवारी ते 23 मार्चच्या दरम्यान देशातील विविध संघटनांनी एकत्र येऊन या कायद्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून प्रत्येक समाजातील शेवटच्या घटकाला जागरूक करण्यासाठी प्रयत्न होणार असल्याची माहिती योगेंद्र यादव यांनी दिली. माती वाचवण्याच्या लढाईत सर्वांनी समील होण्याचे आवाहन त्यांनी केले.

Intro:जळगाव
काही लोक देशात फूट पाडण्याचे षडयंत्र रचत आहेत. त्यांच्याकडे साम, दाम, दंड असे सर्व काही आहे. सत्ता आहे, प्रसारमाध्यमांची सूत्रे देखील आहेत. मात्र, आपल्याकडे देशाची माती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानच नाही तर महात्मा गांधींजींनी दिलेला अहिंसेचा वारसाही आहे. आपल्या एका हातात तिरंगा तर दुसऱ्या हातात संविधान आहे. देशाचे मूळ कापणे म्हणजे देशद्रोह असून सीएए व एनआरसी कायदा आणून केंद्र सरकार देशाच्या एकात्मतेत फूट पाडण्याचे काम करीत आहे. सरकार हा देशद्रोह करीत आहे. मोदी-शाह हीच खरी तुकडे तुकडे गँग आहे, अशी टीका राजकीय विचारवंत, कृषी चळवळीचे मार्गदर्शक योगेंद्र यादव यांनी केली.Body:भारतीय संविधान बचाव नागरी कृती समितीच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या सभेला आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते. दरम्यान, या सभेला विद्यार्थी नेता उमर खालिद तसेच गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी उपस्थित राहणार होते. परंतु, जळगाव जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत त्यांना सभेला उपस्थित राहण्याची परवानगी नाकारली. पोलिसांनी केवळ यादव यांनाच सभेची परवानगी दिली.

योगेंद्र यादव पुढे म्हणाले, उमर खालिद आज सभेला उपस्थित नाही, याचे दुःख झाले. उत्तर प्रदेशातील असा विरोध होणं समजू शकतो पण महाराष्ट्रात असा विरोध होणं योग्य नाही. शाहीनबागमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या जात नाहीत तर भारत मातेच्या जयघोषाच्या घोषणा दिल्या जात आहेत. पंतप्रधान म्हणतात की मी कपड्यांवरून माणसे ओळखतो. पण पंतप्रधानांना फक्त टोपी दिसते. तिरंगा दिसत नाही. मोदी यांच्याऐवजी जर कोणी दुसरा पंतप्रधान राहिला असता त्याला तिरंगा पाहून, भारत मातेच्या जयघोषाच्या घोषणा ऐकून गर्व झाला असता. मात्र, मोदींना त्याचा गर्व वाटत नाही. या लोकांच्या पूर्वजांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेले नाही. भगतसिंग यांनी एकही माफीनामा दिला नाही. मात्र, अंदमानातून हे माफीनामे लिहून पाठवत होते. देशाचे संविधान आपल्याला स्वातंत्र्य बहाल करते. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडणे हा देशद्रोह आहे. त्यापेक्षा मोठा देशद्रोह नाही. आज देशभरात मोठे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आता दुसऱ्या टप्प्यात आले आहे. सीएए आणि एनआरसी यांना विरोध केला जात आहे. भाजपकडून टीव्हीवर जे सांगितले जात आहे ते लिहून दिले पाहिजे. सीएए कायद्यात शरणार्थी, अल्पसंख्याक, पीडित, शेजारी हे 4 शब्द नाहीत. मात्र, भाजप ते उघडपणे सांगायला तयार नाही. इथेच खरी गुंतागुंत आहे. भारत असा देश आहे ज्याने कधीही शरणार्थींना धर्म, जात विचारली नाही. हा मुद्दा स्वामी विवेकानंद यांनी सांगितला आहे. पंतप्रधानांनी हेच सांगणे गरजेचे आहे. शरणार्थींना धर्म, जात विचारणार नाही, हे त्यांनी जाहीर करावे. असा कायदा भाजप आणत असेल तर आम्ही या कायद्याचे स्वागत करू. सीएए कायद्यात मुस्लिम देशातील गैरमुस्लिम लोकांना शरण देण्यात येणार आहे. तर इतरांवर अन्याय का? श्रीलंका, तिबेट तसेच नेपाळमधील तमीळ, तिबेटी, बौद्ध लोकांना का शरण दिले जात नाही. पाकिस्तानातील हिंदूंना 50 वर्षांपासून भारतात शरण दिले जात आहे. त्यात नवीन बाब काय? सीएए कायदा म्हणजे जिलेबीसारखा आहे. भारतातील नागरिकांमध्ये फूट पाडणे, हा या कायद्याचा उद्देश आहे, अशा शब्दांत यादव यांनी टीका केली.Conclusion:22 फेब्रुवारीपासून देशभर जनजागृती-

मोदीजी खोटं खूप चांगलं बोलतात. एनपीआरसाठी जेव्हा कोणी तुमच्या घरी येईल तेव्हाच त्याला विरोध करा, अन्यथा पुढे जाऊन संकट वाढेल. महात्मा गांधीजींनी सांगितले आहे की अन्यायपूर्वक असलेल्या कायद्याला कडाडून विरोध केला पाहिजे. आज देशभर सीएए कायद्याला विरोध सुरू आहे. आता सर्वांनी मिळून त्याला विरोध करण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने देखील या कायद्याला विरोध केला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने जनगणना आणि एनपीआर या दोन्ही बाबी वेगवेगळ्या पद्धतीने हाताळल्या पाहिजेत. 22 फेब्रुवारी ते 23 मार्च 2020 दरम्यान देशातील विविध संघटनांनी एकत्र येऊन या कायद्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून प्रत्येक समाजातील शेवटच्या घटकाला जागरूक करण्यासाठी प्रयत्न होणार आहे. आपण सर्व जण एकत्र आले तर निश्चितच हा प्रयत्न यशस्वी होईल. ही लढाई आपली माती वाचविण्यासाठी आहे, हे लक्षात घ्या, असे आवाहन देखील यादव यांनी यावेळी केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.