ETV Bharat / state

जळगाव : विजेचा धक्का लागून दिव्यांग महिलेचा मृत्यू - जळगाव महिलेचा मृत्यू

उकाडा सहन होत नसल्याने अनेकांनी आपल्या घरात कुलर लावले आहेत. मात्र, उकाडा दूर करणारे हेच कुलर सुनीता कुमावत या दिव्यांग महिलेच्या जिवावर बेतले. कुलरमुळे विजेचा लागून सुनीता कुमावत या महिलेचा मृत्यू झाला.

Sunita Dnyaneshwar Kumawat
मृत सुनीता ज्ञानेश्वर कुमावत
author img

By

Published : May 6, 2020, 2:41 PM IST

Updated : May 6, 2020, 3:44 PM IST

जळगाव - विजेचा प्रवाह कुलरमध्ये उतरला होता. कुलरचा स्पर्श होऊन विजेचा धक्का बसल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी हनुमान नगर येथे घडली. सुनीता ज्ञानेश्वर कुमावत (वय 32) असे मृत महिलेचे नाव आहे.

उन्हाचा पारा वाढला आहे. उकाडा सहन होत नसल्याने अनेकांनी आपल्या घरात कुलर लावले आहेत. मात्र, उकाडा दूर करणारे हेच कुलर सुनीता कुमावत या दिव्यांग महिलेच्या जिवावर बेतले. सुनीता कुमावत शौचालयातून बाहेर निघाल्यानंतर त्यांचा जवळच ठेवलेल्या पत्री कुलरला धक्का लागला. या कुलरमध्ये विजेचा प्रवाह उतरलेला होता. त्यातील विजेच्या धक्क्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृत सुनीता यांना रेणुका (वय १२) व मुलगा राज (वय ४) ही दोन मुले आहेत. बालपणातच या मुलांच्या डोक्यावरुन आईचे छत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Last Updated : May 6, 2020, 3:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.