जळगाव - चाळीसगांव तालुक्यात असलेल्या गिरणा धरणातील जलसाठा ५० टक्क्यांवर आला आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या गेल्या तीन महिन्यांच्या काळात सिंचनासाठी तीन आवर्तने साेडण्यात आली आहेत. १०० टक्के जलसाठा असलेल्या या धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांनी घटला आहे. त्यामुळे आता उन्हाळ्यात पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाची कसाेटी लागणार असून पुढील काळात पिण्यासाठी दाेन आवर्तने साेडण्याचे नियाेजन पाटबंधारे विभागाने केले आहे.
सलग दुसऱ्या वर्षी १०० टक्के धरण
गिरणा धरण उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे. जिल्ह्यातील १७५ गावांची तहान ते भागवते. तसेच एक लाख ४१ हजार ३६४ एकर क्षेत्र भिजवण्याची क्षमता या धरणाची आहे. ज्यावर्षी धरणात समाधानकारक साठा असतो त्यावर्षी रब्बीचा हंगाम दमदार असतो. पाणी टंचाईदेखील भासत नाही. त्यामुळे या धरणाच्या जलसाठ्याकडे सर्व सामान्यांसह शेतकऱ्यांच्याही नजरा लागून असतात. तीन वर्षांपूर्वी समाधानकारक पाऊस न झाल्याने हे धरण अवघे ४९ टक्केच भरले होते. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. गिरणा धरणावर मालेगाव, नांदगाव, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा शहरांची तसेच गावांची तहान भागते. यंदाही पाणलाेट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने निम्म्या जिल्ह्यास वरदान ठरणारे गिरणा धरण सलग दुसऱ्या वर्षी १०० टक्के भरले हाेते. त्यामुळे निम्म्या जिल्ह्याची पाणी चिंता मिटली हाेती. सुरुवातीस सिंचनासाठी तीन व नंतर पिण्याच्या पाण्यासाठी दाेन अशी एकूण ५ आवर्तने गिरणा धरणातून साेडण्याचे नियाेजन केले हाेते.
धरणात सध्या ५०.८४ टक्के जलसाठा
धरणाचे दाेन गेट गेल्या तीन महिन्यांपासून उघडे हाेते. धरणातून सुरू असलेला हा विसर्ग फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी थांबला. २६ फेब्रुवारी राेजी सकाळी ६ वाजता धरणाचे दाेन्ही गेट बंद करण्यात आले. गेली तीन महिने सतत विसर्ग सुरू असल्यामुळे डिसेंबर महिन्यात १०० टक्के जलसाठा असलेल्या धरणाच्या पाणीसाठ्यात ५० टक्के घट झाली. धरणात आजच्या घडीला मृत साठा धरून १२ हजार ४०५ दलघफु असा ५०.८४ टक्के एवढा साठा शिल्लक आहे.
पाऊस न झाल्याने ४९ टक्केच भरले धरण
मागच्यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने हे धरण अवघे ४९ टक्केच भरले होते. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. गिरणा धरणावर मालेगाव, नांदगाव, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा शहरांची तसेच गावांची तहान भागते. यंदाही पाणलाेट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने निम्म्या जिल्ह्यास वरदान ठरणारे गिरणा धरण सलग दुसऱ्या वर्षी १०० टक्के भरले हाेते. त्यामुळे निम्म्या जिल्ह्याची पाणी चिंता मिटली हाेती. सुरुवातीस सिंचनासाठी तीन व नंतर पिण्याच्या पाण्यासाठी दाेन अशी एकूण ५ आवर्तने गिरणा धरणातून साेडण्याचे नियाेजन केले हाेते.