जळगाव - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठींबा मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय-
केंद्र शासनाने पारित केलेले कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहेत. केंद्राने नवीन कायदा पास करतांना कोणतीही चर्चा न करता मंजूर केला. या कायद्यामुळे शेतकऱ्यांवर मोठ्याप्रमाणावर अन्याय झाला आहे. त्यामळे वंचित बहुजन आघाडीने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरूस्ती करणारा अध्यादेश काढावा-
तसेच, महाराष्ट्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरूस्ती करणारा अध्यादेश त्वरीत काढावा. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या शेत मालाला हमी भाव मिळावा याची तरतूद करावी, रेल्वेचा खाजगीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने त्वरीत रद्द करावा, यासह आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
यांची होती उपस्थिती-
यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, महिला प्रदेशाध्यक्षा शामिभा पाटील, प्रमोद इंगळे, जिल्हा महसचिव दिनेश इखारे, देवदत्त मकासरे, डिंगबर सोनवणे, विद्यासागर खरात, प्रकाश सोनवणे, जितेंद्र केदार, गिरीष नेहते, सचिन वानखेडे, राहूल सपकाळे, वंदना सोनवणे , फिरोज शेख, भिमराव सोनवणे, संगिता मोरे, पंचशिला आराक, ॲड, विनोद इंगळे, संगिता भामरे, वनिता इंगळे, जयश्री ननवरे, नाजीमाबी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा- PSLV C-50 अवकाश यानाचे यशस्वी प्रक्षेपण, संपर्क व्यवस्था होणार मजबूत