ETV Bharat / state

‘डीन’च्या खुर्चीवर अनधिकृतरित्या ताबा, सहयोगी प्राध्यापकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल - डीनच्या खुर्चीवर अनधिकृतरित्या ताबा जळगाव बातमी

तत्कालीन अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या कार्यकाळात सहयोगी प्रा. डॉ. डांगे यांनी खैरे यांच्या गैरहजेरीत थेट ‘मीच आता डीन, माझे सर्वांनी ऐका’, असे तब्बल तीन वेळा सहकाऱ्यांना सांगितले होते. ‘डीन’ यांच्या खुर्चीवर बसून समोरच्या टेबलावर पायही ठेवले होते. त्यांना समजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी समजून न घतल्याने डीन डॉ. रामानंद यांनी डॉ. डांगेविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल केली.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची प्रतिक्रिया

author img

By

Published : Sep 27, 2020, 2:06 PM IST

जळगाव : जिल्हा कोविड रुग्णालयात शरीरक्रिया शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. चंद्रशेखर डांगे यांनी सलग चौथ्यांदा ‘डीन’च्या खुर्चीचा ताबा घेतला. आता मीच ‘डीन’ असा आविर्भाव दाखवत ते ‘डीन’च्या खुर्चीवर बसले आणि टेबलावर पाय टाकून बसून ‘मी सर्वांचा बॉस आहे’, असे सांगत आज सकाळी गोंधळ घातला. विशेष म्हणजे, महाविद्यालयाचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद हे त्यांच्या कार्यालयात होते. त्यांच्यासमोर हा प्रकार घडल्याने तेही चक्रावून गेले.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची प्रतिक्रिया

तत्कालीन अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या कार्यकाळात सहयोगी प्रा. डॉ. डांगे यांनी खैरे यांच्या गैरहजेरीत थेट ‘मीच आता डीन, माझे सर्वांनी ऐका’, असे तब्बल तीन वेळा सहकाऱ्यांना सांगितले होते. ‘डीन’ यांच्या खुर्चीवर बसून समोरच्या टेबलावर पायही ठेवले होते. डीन डॉ. रामानंद यांनी डॉ. डांगे यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी समजून न घतल्याने डीन डॉ. रामानंद यांनी डॉ. डांगे यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी लागली. त्यानंतर पोलीस जिल्हा कोविड रुग्णालयात आले. डॉ. डांगे यांना ताब्यात घेऊन गेले. या गैरवर्तणुकीची आता चौकशी सुरू आहे. डॉ. डांगे यांच्या या कारनाम्याबाबत आरोग्य संचालकांना पत्र पाठविण्यात आले होते.

डीन’ डॉ. रामानंद यांनी डॉ. डांगे यांची फाइल नुकतीच रिओपन केली होती. डॉ. डांगे यांच्यावर प्रशासकीय कारवाईसाठी शरीरक्रिया शास्त्र विभागाच्या प्रमुखांकडून अहवाल मागवला आहे. तो आल्यानंतर डॉ. रामानंद त्यांचा अहवाल आरोग्य विभागाला सादर करतील. आज सकाळी पुन्हा डॉ. डांगे यांनी डीनच्या खुर्चीवर बसून गोंधळ घातला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.