ETV Bharat / state

दहशतवादी तहव्वूर राणाला पुन्हा अटक होणे, भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे - उज्ज्वल निकम

पाकिस्तानी कॅनेडियन दहशतवादी तहव्वूर हुसेन राणा याला अमेरिकेच्या लॉस एंजलिस शहरात पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला भारतात आणण्याची चर्चा सुरू झाली आहे. या विषयावर मुंबई दहशतवादी हल्ल्याचा खटला सरकारच्या वतीने लढणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उज्ज्वल निकम
उज्ज्वल निकम
author img

By

Published : Jun 20, 2020, 2:05 PM IST

Updated : Jun 20, 2020, 2:54 PM IST

जळगाव- मुंबईतील २००८च्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात सामील असलेला पाकिस्तानी कॅनेडियन दहशतवादी तहव्वूर हुसेन राणा याला अमेरिकेच्या लॉस एंजलिस शहरात पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. तहव्वूर राणाला पुन्हा अटक होणे म्हणजे भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज जळगावात दिली.

पाकिस्तानी कॅनेडियन दहशतवादी तहव्वूर राणा याला अमेरिकेच्या लॉस एंजलिस शहरात पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला भारतात आणण्याची चर्चा सुरू झाली आहे. या विषयावर मुंबई दहशतवादी हल्ल्याचा खटला सरकारच्या वतीने लढणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, तहव्वूर राणा याला पुन्हा अटक होणे, हा भारताच्या दृष्टीने मोठा विजय आहे, असे मी मानतो. २६/११ ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात राणाचा सहभाग होता. राणा आणि मिस्टर सेंडस हे शिकागो येथे एमिग्रेट लॉ सेंटर चालवत होते. राणाने डेव्हिड हेडलीच्या मदतीने मुंबईत एमिग्रेट लॉ सेंटरचे ऑफिस उघडले होते. त्यानिमित्ताने डेव्हिड हेडली हा हल्ला करण्याच्या आधी मुंबईत आला. मुंबईत ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करायचा आहे, त्या ठिकाणांचे त्याने फोटो काढले. ते फोटो घेऊन तो शिकागोला गेला. त्यानंतर त्याने ते फोटोग्राफ लष्कर-ए-तोयबाच्या कमांडर्सना दिले. अशी खळबळजनक साक्ष डेव्हिड हेडलीने मुंबईच्या न्यायालयात दिली असून ती मी स्वतः घेतली आहे. या कामासाठी मला राणा पैसे पुरवत होता, असेही हेडलीने आपल्या साक्षीत सांगितले आहे. डेव्हिड हेडली मुंबईच्या दहशतवादी कटात सहभागी असल्याने त्याला शिकागोच्या न्यायालयाने 35 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आम्ही हेडलीची मुंबई न्यायालयात साक्ष घेतली; जेणेकरून पाकिस्तान दहशतवादी हाफिज सईद, जकी उर रहमान यांच्याविरुद्ध कारवाई करेल. परंतु, तरीदेखील पाकिस्तानने त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही, असेही उज्ज्वल निकम यावेळी म्हणाले.

राणाविरुद्ध निश्चित कारवाई होईल-

तहव्वूर राणा याच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयाने एक अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आता त्याच्याविरुद्ध गुन्हेगार हस्तांतर कायद्यान्वये कार्यवाही करण्यात येईल. जेणेकरून त्याला भारतात आणणे सोपे होईल. राणा हा मुंबई दहशतवादी हल्ल्यातला महत्त्वाचा साथीदार असल्याने त्याच्याविरुद्ध भारताकडे भरभक्कम पुरावे आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध निश्चित कारवाई होणार आहे, असा विश्वास देखील उज्ज्वल निकम यांनी यावेळी व्यक्त केला.

उज्ज्वल निकम, सरकारी वकील

Last Updated : Jun 20, 2020, 2:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.