ETV Bharat / state

Uddhav Thackeray Jalgaon Sabha 'आम्ही देशाचे नाव बदलणार नाही, पंतप्रधान बदलू' - उद्धव ठाकरे - उद्धव ठाकरे जळगाव वचनपूर्ती सभा

Uddhav Thackeray Jalgaon Sabha ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पिंप्राळा, जळगाव येथील ‘वचनपूर्ती’ सभेत भाजपावर कडाडून टीका केली. तसेच मराठा आरक्षणावरून राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र

Uddhav Thackeray Jalgaon Sabha
Uddhav Thackeray Jalgaon Sabha
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 8:05 PM IST

जळगाव Uddhav Thackeray Jalgaon Sabha- ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपासह मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. इंडिया आघाडीच्या कार्यक्रमामुळे केंद्रातील एनडीए हादरल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. ते जळगावमधील जाहीर सभेत बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, इंडिया आघाडीमुळे त्यांना ( भाजपा) एवढा संताप आला आहे की त्यांनी देशाचे नाव बदलले आहे. अशा नाव बदलण्याच्या खेळात आम्ही भाग घेणार नाही. आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षासह देशाचे पंतप्रधान बदलणार आहोत. ०२४ च्या निवडणुकीत भाजपा सत्तेत येणार नसल्याचाही त्यांनी दावा केला. देशाची भारत, इंडिया किंवा हिंदुस्थान ही सर्व नावे आहेत. आम्हाला आवडणारी नावे वापरू आणि कोणतेही नाव आमच्यावर लादले जाऊ शकत नाही.

  • उद्धव ठाकरेंना यापुढे जाहीरसभेतून 'घरकोंबडा' म्हणावं लागेल कारण त्यांनी आता राजकारणाची सर्व पातळी सोडली आहे. खरे तर सत्तेसाठी तुम्ही 'हपापले होते आणि आहात. आदरणीय @narendramodi जी आणि @Dev_Fadnavis जींवर केलेली वैयक्तिक टीका भाजप सहन करणार नाही.

    देवेंद्रजींनी कायम…

    — Chandrashekhar Bawankule (@cbawankule) September 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

छत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकार नाही- २५ ते ३० वर्षे भाजपासोबत असताना त्यांच्यासारखो झालो नाही. मग, आता शिवसेना ( ठाकरे गट) काँग्रेस कशी होणार असा प्रश्न त्यांनी भाजपाला उपस्थित केला. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनादरम्यान गोध्रा घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी त्यांनी भीती व्यक्त केली. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाला. अशा अत्यंत दु:खद आणि गंभीर विषयांवर मौन बाळगणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असा ठाकरे यांनी मोदी सरकारला टोला लगावला.

शब्द देताना लाखवेळा विचार करा, पण शब्द दिल्यावर प्राण गेला तरी शब्द पडू द्यायचा नाही, अशी शिवसेाना प्रमुखांची शिकवण आहे. तुम्ही आमची आजपर्यंत मैत्री अनुभवलीत, आता राज्यभरात पेटलेल्या मशालीची धग अनुभवा.हिंदुत्ववादी सरकार सत्तेत असतानाही जनआक्रोश मोर्चा काढावा लागत असेल तर सत्तेच्या खुर्चीवरून खाली उतरा-उद्धव ठाकरे

जालियानवाला बाग हत्याकांडाप्रमाणो पोलिसांचा लाठीचार्ज- नवी दिल्लीला जाण्यासाठी आणि G-20 च्या मान्यवरांसह फोटो क्लिक करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना वेळ मिळाला. परंतु मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. जरांगे पाटील हे जालन्यात 13 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. १ सप्टेंबरला पोलिसांनी मराठा आंदोलनावर केलेली कारवाई म्हणजे जालियानवाला बाग हत्याकांडातील ब्रिटिशांच्या कारवाईप्रमाणे होती. टरबुज्या असे म्हणत ठाकरे यांनी भाजपा नेत्यांची खिल्ली उडविली.

  • प्रमुख मार्गदर्शक - पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे । वचनपूर्ती सभा । जळगाव - #LIVE https://t.co/iuwjULDk1O

    — Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) September 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजपाला पुढील निवडणुकीत पराभूत करा-उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, जरांगे-पाटील यांच्या मागण्या काय आहेत, हे जाणण्यासाठी किमान त्यांच्याशी बोला. आम्ही त्यांना भेटलो आहोत. मात्र, राज्य सरकारचा कोणताही अधिकृत प्रतिनिधी जरांगे पाटील यांच्याशी संवाद का साधत नाही? की त्या गद्दार अर्जुन खोतकर यांना तिथे पाठविले आहे, अशी घणाघाती टीकाही ठाकरे यांनी केली. पुढील निवडणुकीत देशद्रोही, भ्रष्टाचारी आणि खोटी आश्वासने देणाऱ्यांना पुढील निवडणुकीत पराभूत करावे, असे त्यांनी आवाहन केले. ठाकरे यांच्या हस्ते जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे आज लोकार्पण करण्यात आले.

घरकोंबडा म्हणावं लागेल- जाहीर सभेत टरबुज्या म्हटल्यानं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले आहेत. त्यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, उद्धव ठाकरेंनी आता राजकारणाची पातळी सोडलीय. त्यांना आता घरकोंबडा म्हणावं लागेल. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केलेली टीका आम्ही सहन करणार नाही. फडणवीस यांनी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तसेच कोरोनाच्या काळात रुग्णालयात जाऊन लोकांना धीर दिला. उलट तुम्ही घरकोंबडा होऊन फेसबुक लाईव्ह करत होतात. सत्ता गेल्यानंतर तुम्हाला जाग आली आणि तुम्हाला जळगाव दिसलं. येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला जनता धडा शिकविले, अशा विश्वास भाजपा प्रदेशाध्याक्ष बावनकुळे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा-

  1. Kirit Somaiya on Ravindra Waikar: पंचतारांकित हॉटेल घोटाळ्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचीही चौकशी करा- किरीट सोमैया
  2. Jalna Maratha Protest : लोकांच्या केसाला हात लावला तर..; उद्धव ठाकरेंचा राज्यसरकारला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.