ETV Bharat / state

जळगावात चाकूचा धाक दाखवित लुटणाऱ्या दोघांना अटक - जळगाव क्राईम घटना

शाहुनगरातील पिंप्राळा रस्ता परिसरात विलास मुरलीधर नाईक यांचे कपाट विक्रीचे दुकान आहे. या ठिकाणी कपाट खरेदी करण्याचा बहाणा करून दुकानात शिरलेल्या दोन भामट्यांनी दुकानदारास चाकूचा धाक दाखवत पैसे व मोबाईलची चोरी केली होती.

जळगाव
जळगाव
author img

By

Published : Nov 26, 2020, 7:27 PM IST

जळगाव - कपाट खरेदी करण्याचा बहाणा करून दुकानात शिरलेल्या दोन भामट्यांनी दुकानदारास चाकूचा धाक दाखवत पैसे व मोबाईलची चोरी केली. दि. २ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० वाजता शाहुनगर भागात ही घटना घडली होती. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना गुरुवारी अटक केली. दीपक चैनराज ललवाणी (वय ३२, रा. मुसळी फाटा, ता. धरणगाव) व दीपक भिका चव्हाण (वय ३२, रा. इंद्रनिल सोसायटी, जळगाव) असे अटक केलेल्या भामट्यांची नावे आहेत.

शहर पोलिसात गुन्हा दाखल

शाहुनगरातील पिंप्राळा रस्ता परिसरात विलास मुरलीधर नाईक यांचे कपाट विक्रीचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी दोघांपैकी एक भामटा सुरुवातीला नाईक यांच्या दुकानात गेला. त्याने कपाट खरेदी करण्याबाबत विचारणा केली. यावेळी कपाट शिल्लक नाहीत, असे नाईक यांनी सांगितले. काही क्षणातच दुसरा भामटा दुकानात शिरला. त्याने चाकूचा धाक दाखवत नाईक यांना धमकावले. नंतर दुकानाचे शटर आतून बंद करून घेतले. यांनतर नाईक यांच्या शर्टच्या खिशातील एक हजार रुपये व काऊंटरवरील दोन मोबाईल उचलून दोघांनी पळ काढला होता. या प्रकरणी नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथकाने मुसळी फाटा येथून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.