ETV Bharat / state

मालेगावला बंदोबस्तावर गेलेल्या जळगावातील 2 पोलिसांना कोरोनाची लागण; दोघे 93 जणांच्या संपर्कात - जळगाव कोरोना लेटेस्ट अपडेट

कोरोना पॉझिटिव्ह म्हणून समोर आलेले दोन्ही पोलीस कर्मचारीही एरंडोल येथील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत इतर 93 पोलीस कर्मचाऱ्यांसोबत क्वारंटाईन होते. त्यामुळे उर्वरित 93 पोलीस कर्मचाऱ्यांची देखील चिंता वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात येणार आहेत.

jalgaon police
जळगाव पोलीस
author img

By

Published : May 20, 2020, 8:25 AM IST

जळगाव - नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बंदोबस्ताकामी गेलेल्या जळगाव पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी सायंकाळी या दोन्ही पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बंदोबस्ताचे कामकाज आटोपल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांसोबत इतर 93 पोलीस कर्मचारी देखील एकाच ठिकाणी क्वारंटाईन होते. त्यामुळे पोलीस प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

मालेगाव येथे कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याने जळगाव पोलीस दलातील 100 पोलीस कर्मचारी बंदोबस्ताच्या कामासाठी त्या ठिकाणी गेले होते. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे जळगाव पोलीस दलातील 100 पोलीस कर्मचाऱ्यांपैकी पाच पोलीस कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता बंदोबस्तावरून परस्पर घरी परत आले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी सखोल चौकशी करत बंदोबस्तावरून पळून आलेल्या 5 जणांना सेवेतून निलंबित केले आहे. उर्वरित 95 पोलीस कर्मचारी आठ दिवसांपूर्वी बंदोबस्त पूर्ण करून जळगाव जिल्ह्यात परतले होते. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना एरंडोल येथील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. या 95 पोलीस कर्मचाऱ्यांपैकी दोन पोलिसांना शारीरिक त्रास जाणवू लागला होता. त्यांना कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी दोघांचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले. त्याचा अहवाल आज सायंकाळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला असून दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

पॉझिटिव्ह असलेले दोन्ही पोलीस कर्मचारी जळगाव शहरातील दक्षता नगरचे रहिवासी आहेत. या प्रकारामुळे जळगाव पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या वृत्तास जळगाव पोलीस दलाच्या मुख्यालयातील पोलीस उपअधीक्षक (गृह) बी. एन. पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

इतर 93 पोलीस कर्मचाऱ्यांची चिंता वाढली-

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.