ETV Bharat / state

जळगावात राजकारण्यांच्या दोन गटात हॉटेलमध्ये राडा; एकाने रोखले पिस्तूल - जळगाव मध्ये दोन गटात वाद

जळगावमध्ये महामार्गावरील एका हॉटेलमध्ये दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी आणि जळगाव माहपालिकेतील गटनेते भगत बालाणी याच्यासह जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

two-groups-of-jalgaon-politicians-had-an-argument-in-the-hotel
जळगावात राजकारण्यांच्या दोन गटात हॉटेलमध्ये राडा; एकाने रोखले पिस्तूल
author img

By

Published : Dec 15, 2020, 10:20 PM IST

जळगाव - कुत्र्याच्या अंगावर खुर्ची फेकल्याच्या क्षुल्लक कारणावरुन जळगाव शहराजवळ महामार्गावर असलेल्या एका हॉटेलात दोन गटात हाणामारी झाली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, जळगाव महापालिकेतील भाजपचे गटनेते भगत बालाणी, भाजपचे माजी नगरसेवक सुनील माळी यांचे भाऊ मुकेश माळी यांच्यासह जमावावर आज मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेचा गुन्हा उशिरा फिर्याद दाखल झाल्याने आज दाखल झाला. या हाणामारीत एकाने पिस्तूल रोखल्याने खळबळ उडाली होती.

जळगावात राजकारण्यांच्या दोन गटात हॉटेलमध्ये राडा; एकाने रोखले पिस्तूल

या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी त्यांचे साथीदार केदारनाथ वामन सानप, दुर्गेश ठाकूर, चौधरी यांचा वाहनचालक गोलू (सर्व रा. भुसावळ), यांच्यासह जळगाव महापालिकेतील भाजप गटनेते भगत रावलमल बालाणी हे सर्व जण रविवारी रात्री जळगाव-भुसावळ महामार्गावरील महिंद्रा हॉटेल येथे जेवणासाठी गेले होते. याचवेळी माजी नगरसेवक सुनील माळी यांचे भाऊ मुकेश दत्तात्रय माळी, छोटु पाटील व त्यांचे तीन मित्र देखील हॉटेलमध्ये बाजुच्या टेबलवर जेवण करीत होते. जेवण आटोपल्यानंतर अनिल चौधरी यांनी रिकामी खुर्ची कुत्र्याच्या अंगावर फेकली. या कारणावरुन चौधरी व माळी यांच्यात वाद झाला. शाब्दिक वाद टोकाला गेल्याने दोन्ही गटाकडील इतर साथीदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यात हाणामारी झाली.

पिस्तूल रोखल्याचे हॉटेलात उडाली खळबळ-

शाब्दिक वादाचे रुपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले. यावेळी केदारनाथ सानप याने कमरेला खोचलेली पिस्तूल बाहेर काढून समोरच्या लोकांवर रोखल्याने खळबळ उडाली. त्यानंतर काहीवेळाने दोन्ही गटांनी भांडण आपसात मिटवले. मात्र, घटनेच्या दुसऱ्या दिवशी हाणामारीत पिस्तूल रोखल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली.

पोलिसांनी शहानिशा करत केला गुन्हा दाखल-

दरम्यान, या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी एक पोलीस पथक हॉटेल महिंद्रा येथे चौकशीसाठी पाठवले. हॉटेलचे मालक तुषार फकिरा बाविस्कर यांच्याकडून पोलिसांनी घटनेची माहिती घेतली. हॉटेलमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही ताब्यात घेतले. या फुटेजमध्ये दोन्ही गटात झालेले भांडण तसेच एकाने पिस्तूल बाहेर काढल्याचे स्पष्ट दिसत आहे. या अनुषंगाने मंगळवारी पोलीस कर्मचारी मुकेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौधरी व माळी गटातील सर्व जणांवर दंगल, हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पिस्तूलचा परवाना होता, परंतु दहशत माजवल्याने गुन्हा -

हाणामारीत केदारनाथ सानप याने कंबरेला खोचलेले पिस्तूल बाहेर काढत रोखले होते. त्याच्याकडे पिस्तूल वापरण्याचा परवाना असल्याचे समोर आले आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी पिस्तूल काढून दशहत माजवल्यामुळे परवान्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यानुसार त्याच्यावर आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.