ETV Bharat / state

जळगाव : ट्रक आणि कारच्या धडकेत दोन ठार; तर तिघे जखमी

author img

By

Published : Feb 28, 2021, 9:11 AM IST

शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास उमाळा घाटात ट्रकने कारला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात दोन ठार, तर तिघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

Two death and three injured in truck-car accident in jalgaon
जळगाव : ट्रक आणि कारच्या धडकेत दोन ठार; तर तिघे जखमी

जळगाव - उमाळा घाटात ट्रकने कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात आठ वर्षीय बालिकेसह दोन जण ठार झाले. शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. नम्रता रामेश्वर चौधरी (8) आणि दिगंबर रामराव भोसले (40) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. मृत नम्रता हिचे वडील रामेश्वर रामराव चौधरी (35), आई अर्चना रामेश्वर चौधरी (32) आणि लहान भाऊ साई चौधरी (6) हे जखमी झाले आहेत.

आजीला भेटून घरी परतताना झाला अपघात -

अर्चना चौधरी यांच्या माहेरकडील नातेवाईक जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना पाहण्यासाठी चौधरी कुटुंबिय शनिवारी दुपारी मित्राच्या कारने (एमएच 19 बीयू 3918) जळगावात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत गावात राहणारे मित्र दिगंबर भोसलेदेखील जळगावात आले होते. उपचार घेणाऱ्या नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर सर्वजण घरी परत जाताना उमाळा घाटात त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने (एमएच 41 एयू 1807) जोरदार धडक दिली. या अपघातात नम्रता चौधरी व दिगंबर भोसले हे ठार झाले. तर कारमधील अन्य तिघे जखमी आहेत.

एमआयडीसी पोलिसांची घटनास्थळी धाव -

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तसेच मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची बातमी मिळाल्यानंतर वाकोद गावातील ग्रामस्थांनीदेखील जळगावकडे धाव घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका महाराष्ट्रात होणार; ठाकरे सरकारचा हिरवा कंदिल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.