ETV Bharat / state

जळगावात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, रिक्षाचालक बचावला - accident at jalgaon

अपघातात मृत झालेले विक्की आणि हेमंत हे दोघे मित्र होते. ते एका खासगी कंपनीत कामाला होते. मंगळवारी दुपारी ते महामार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण केल्यानंतर ते दुचाकीने (एमएच १९ एन ६१८१) शहरात परत येत असताना महामार्गावर बांभोरी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात विक्कीचा जागेवरच मृत्यू झाला. तर हेमंत गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पडला.

jalgaon
जळगावात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, रिक्षाचालक बचावला
author img

By

Published : Dec 10, 2019, 10:24 PM IST

जळगाव - भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या उपघातात दुचाकीवरील दोन तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर बांभोरी पुलाजवळ ही घटना घडली. विवेक उर्फ विक्की पंढरीनाथ नन्नवरे (वय ३१) आणि हेमंत चंद्रहास ललवाणी (वय ३४, दोघेही रा. आहुजानगर, जळगाव) अशी या अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत.

हेही वाचा - ...म्हणून चंदू चव्हाणने मागितली इच्छा मरणाची परवानगी

या अपघातात दुचाकीला धडक देणाऱ्या ट्रकपासून बचाव करीत असताना एक रिक्षा थेट रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन उलटली. यात सुदैवाने रिक्षाचालक थोडक्यात बचावला. अपघातात मृत झालेले विक्की आणि हेमंत हे दोघे मित्र होते. ते एका खासगी कंपनीत कामाला होते. मंगळवारी दुपारी ते महामार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण केल्यानंतर ते दुचाकीने (एमएच १९ एन ६१८१) शहरात परत येत असताना महामार्गावर बांभोरी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात विक्कीचा जागेवरच मृत्यू झाला. तर हेमंत गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पडला.

हेही वाचा - कोल्हापुरात मटण दरावर तोडगा निघाला, विक्रेते 480 रुपये किलोने विकायला राजी

जखमी हेमंतने लोकांसमोरच सोडले प्राण

अपघातानंतर जखमी हेमंत वेदनांनी विव्हळत होता. जमलेल्या गर्दीतील लोकांना तो मदतीसाठी विनवण्या करीत होता. 'मला वाचवा' अशी आर्त हाक तो लोकांना देत होता. परंतु अपघाताची भीषणता पाहून कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही. १० मिनिटे विनवण्या केल्यानंतर अखेर हेमंतची प्राणज्योत मालवली. रुग्णवाहिकेने दोघांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणण्यात आले. या अपघाताची तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मृत विक्की याच्या पश्चात आई-वडील, पत्नी व पाच वर्षांचा मुलगा आहे. तर हेमंत हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई व लहान भाऊ दीपक असा परिवार आहे. गेल्यावर्षीच हेमंतच्या वडिलांचे निधन झाले आहे.

Intro:जळगाव
भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे तरुण ठार झाले. हा अपघात आज दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर बांभोरी पुलाजवळ घडला. विवेक उर्फ विक्की पंढरीनाथ नन्नवरे (वय ३१) व हेमंत चंद्रहास ललवाणी (वय ३४, दोघे रा. आहुजानगर, जळगाव) अशी मृत तरुणांची नावे आहेत. दुचाकीला धडक देणाऱ्या ट्रकपासून बचाव करीत असताना एक रिक्षा थेट रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन उलटली. सुदैवाने रिक्षाचालक बचावला.Body:अपघातात ठार झालेले विक्की व हेमंत हे दोघे मित्र होते. ते एका खासगी कंपनीत कामाला होते. मंगळवारी दुपारी ते महामार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण केल्यानंतर ते दुचाकीने (एमएच १९ एन ६१८१) शहरात परत येत होते. महामार्गावर बांभोरी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात विक्कीचा जागेवरच मृत्यू झाला. तर हेमंत गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पडला.

जखमी हेमंतने लोकांसमोरच सोडले प्राण!

अपघातानंतर जखमी हेमंत वेदनांनी विव्हळत होता. जमलेल्या गर्दीतील लोकांना तो मदतीसाठी विनवण्या करीत होता. 'मला वाचवा' अशी आर्त हाक तो लोकांना देत होता. परंतु, अपघाताची भीषणता पाहून कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही. १० मिनिटे विनवण्या केल्यानंतर अखेर हेमंतची देखील प्राणज्योत मालवली. रुग्णवाहिकेने दोघांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. या अपघात प्रकरणी तालुका पाेलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.Conclusion:मृत विक्की याच्या पश्चात आई-वडील, पत्नी व पाच वर्षांचा मुलगा आहे. तर हेमंत हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई ज्योती व लहान भाऊ दीपक असा परिवार आहे. गेल्यावर्षीच हेमंतच्या वडिलांचे निधन झाले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.