ETV Bharat / state

अमळनेरात भूमिपूत्र विरुद्ध आयात उमेदवार या मुद्यावरून घमासान; काट्याच्या लढतीमुळे वातावरण गरम

अमळनेर विधानसभा मतदारसंघात यावेळी विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांना भाजपचे तिकीट मिळाले आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील यांचे प्रमुख आव्हान आहे. पाटील आणि चौधरी यांच्या समर्थकांमध्ये आयात आणि स्थानिक या मुद्यावरून घमासान सुरू आहे.

अमळनेरात भूमिपूत्र विरुद्ध आयात उमेदवार या मुद्यावरून घमासान
author img

By

Published : Oct 17, 2019, 4:01 AM IST

जळगाव - पैसे वाटपाच्या मुद्यावरून गेल्या वेळी जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघ हा राज्यभर चर्चेत आला होता. त्यावेळी भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवारांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाला होता. आत्ताच्या निवडणुकीत देखील वाद होण्याची शक्यता आहे. यावेळी राष्ट्रवादीचे स्थानिक उमेदवार अनिल पाटील आणि विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांच्या समर्थकांमध्ये आयात आणि स्थानिक या मुद्यावरून घमासान सुरू आहे.

अमळनेरात भूमिपूत्र विरुद्ध आयात उमेदवार या मुद्यावरून घमासान

अमळनेर विधानसभा मतदारसंघात यावेळी विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांना भाजपचे तिकीट मिळाले आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील यांचे प्रमुख आव्हान आहे. गेल्यावेळी देखील या दोघांमध्ये सामना रंगला होता. पण चौधरी हे पाटलांना शह देण्यात यशस्वी झाले होते. चौधरी निवडून आल्यानंतर अमळनेर मतदारसंघात स्थानिक नेतृत्त्वाचा मुद्दा पुढे आला. गेले पाच वर्षे चर्चेत राहिलेल्या या मुद्याला आता चौधरींच्या विरोधकांनी उचलून धरला आहे. यावेळच्या निवडणुकीत भाजप उमेदवार शिरीष चौधरींनी बाहेरून भाडोत्री कार्यकर्ते आयात केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस तसेच निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दिली आहे. दरम्यान, निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच मतदारसंघातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा - देशाला जाती-धर्माच्या नावाखाली तोडणाऱ्या मानसिकतेविरुद्ध भाजपचा संघर्ष- स्मृती इराणी

मतदारांना पैसे वाटप करतानाचा व्हायरल झालेला एक व्हिडिओ त्याचबरोबर ८० लाख रुपयांची पकडलेली रोकड या दोन्ही घटना २०१४ सालच्या अमळनेर विधानसभेच्या निवडणुकीतील वातावरण ढवळून काढणाऱ्या ठरल्या होत्या. गेल्या वेळच्या निवडणुकीतील हा पूर्वानुभव लक्षात घेता. राष्ट्रवादीने या निवडणुकीत या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. अमळनेरचे विद्यमान भाजप सहयोगी आमदार असलेल्या शिरीष चौधरींनी मात्र, राष्ट्रवादीची मंडळीच निवडणुकीत सर्वाधिक धुमाकूळ घालत असल्याचा आरोप केला आहे. कोणत्याही नागरिकाला कुठेही संचार करण्यास मुभा असल्याने राष्ट्रवादीकडून होणाऱ्या आरोपाचे खंडन आमदार चौधरींनी केले आहे. मी मूळचा नंदूरबारचा रहिवासी आहे. त्यामुळे माझे बहुसंख्य समर्थक हे नंदुरबारचे आहेत. आता निवडणुकीत मला मदत करण्यासाठी ते अमळनेर मतदारसंघात आले आहेत, त्यात चुकीचे काय, असा प्रश्न करत शिरीष चौधरींनी राष्ट्रवादीकडून होणारे आरोप फेटाळले आहेत.

दरम्यान, अमळनेरच्या निवडणुकीत यंदा विकासाच्या मुद्द्यांसोबतच भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा आयात उमेदवार, हाही मुद्दा केंद्रस्थानी आहे. परंतु, मतदारराजा कुणाला कौल देणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Intro:जळगाव
पैसे वाटपाच्या मुद्यावरून गेल्या वेळी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघ हा राज्यभर चर्चेत आला होता. त्यावेळी भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवारांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाला होता. आत्ताच्या निवडणुकीत देखील वादंग होण्याची शक्यता आहे. यावेळी राष्ट्रवादीचे स्थानिक उमेदवार अनिल पाटील आणि विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांच्या समर्थकांमध्ये आयात आणि स्थानिक या मुद्यावरून घमासान सुरू आहे.Body:अमळनेर विधानसभा मतदारसंघात यावेळी विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांना भाजपचे तिकीट मिळाले आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील यांचे प्रमुख आव्हान आहे. गेल्यावेळी देखील या दोघांमध्ये सामना रंगला होता. पण चौधरी हे पाटलांना शह देण्यात यशस्वी झाले होते. चौधरी निवडून आल्यानंतर अमळनेर मतदारसंघात स्थानिक नेतृत्त्वाचा मुद्दा पुढे आला. गेले पाच वर्षे चर्चेत राहिलेल्या या मुद्याला आता चौधरींच्या विरोधकांनी उचलून धरला आहे. यावेळच्या निवडणुकीत भाजप उमेदवार शिरीष चौधरींनी बाहेरून भाडोत्री कार्यकर्ते आयात केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस तसेच निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दिली आहे. दरम्यान, निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच मतदारसंघातील शांतताभंग करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे.

मतदारांना पैसे वाटप करतानाचा व्हायरल झालेला एक व्हिडिओ त्याचबरोबर ८० लाख रुपयांची पकडलेली रोकड या दोन्ही घटना २०१४ सालच्या अमळनेर विधानसभेच्या निवडणुकीतील वातावरण ढवळून काढणाऱ्या ठरल्या होत्या. गेल्या वेळच्या निवडणुकीतील हा पूर्वानुभव लक्षात घेता. राष्ट्रवादीने या निवडणुकीत या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. अमळनेरचे विद्यमान भाजप सहयोगी आमदार असलेल्या शिरीष चौधरींनी मात्र, राष्ट्रवादीची मंडळीच निवडणुकीत सर्वाधिक धुमाकूळ घालत असल्याचा आरोप केला आहे. कोणत्याही नागरिकाला कुठेही संचार करण्यास मुभा असल्याने राष्ट्रवादीकडून होणाऱ्या आरोपाचे खंडन आमदार चौधरींनी केले आहे. मी मूळचा नंदूरबारचा रहिवासी आहे. त्यामुळे माझे बहुसंख्य समर्थक हे नंदुरबारचे आहेत. आता निवडणुकीत मला मदत करण्यासाठी ते अमळनेर मतदारसंघात आले आहेत, त्यात चुकीचे काय? असा प्रश्न करत शिरीष चौधरींनी राष्ट्रवादीकडून होणारे आरोप फेटाळले आहेत.Conclusion:दरम्यान, अमळनेरच्या निवडणुकीत यंदा विकासाच्या मुद्द्यांसोबतच भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा आयात उमेदवार, हाही मुद्दा केंद्रस्थानी ठरला आहे. परंतु, मतदारराजा कुणाला कौल देणार? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.