ETV Bharat / state

मराठी अस्मिता हेच महाराष्ट्राचे खरे वेगळेपण; जळगावातील तरुणाईचे मत

महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला त्याचा सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सारख्या महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्राची भूमी पावन झालेली आहे.

author img

By

Published : May 1, 2019, 7:53 AM IST

महाराष्ट्र दिनाबाबत तरूणाईचे मत

जळगाव - महाराष्ट्र १ मे १९६० ला स्वतंत्र घटक राज्य म्हणून उदयास आला. महाराष्ट्राने आज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे. गेल्या ५९ वर्षात महाराष्ट्रात सामाजिक, आर्थिक तसेच पुरोगामित्वाच्या दृष्टिकोनातून अनेक घडामोडी घडल्या. महाराष्ट्राने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. या देशाला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या महाराष्ट्राने आपली मराठी अस्मिता जोपासली आहे, मराठी अस्मिता हेच महाराष्ट्राचे खरे वेगळेपण आहे, असे मत जळगावातील तरुणाईने व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला 'ई-टीव्ही भारत'ने जळगावातील तरुणाईचे महाराष्ट्राविषयीचे मत जाणून घेतले. महाराष्ट्राची स्थापनेपासून ते आतापर्यंतची वाटचाल, तरुणाईला अभिप्रेत असलेली महाराष्ट्राची प्रगती या बाबींचा उलगडा यानिमित्ताने झाला. मराठी संस्कृती ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला त्याचा सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सारख्या महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्राची भूमी पावन झालेली आहे. त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांच्यासारख्या थोर संतांमुळे महाराष्ट्रात वारकरी सांप्रदायाची बीजे रोवली गेली. आजही त्यांचा वारसा महाराष्ट्र जपत आहे, आणि पुढेही जपत राहील, असेही यावेळी तरुणांनी सांगितले.

स्थापनेपासून ते आता पर्यंतच्या वाटचालीत महाराष्ट्रात विविध क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या. संविधानाचे रचयेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सी.डी. देशमुख असतील महाराष्ट्राने या देशाला मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राने आज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात प्रगती केली असली तरी आजही आपल्या महाराष्ट्रासमोर सामाजिक, आर्थिक तसेच शेतकऱ्यांचे आणि युवकांच्या रोजगाराचे काही प्रश्न आहेतच. या प्रश्नांची उत्तरे शोधताना महाराष्ट्राची निरंतर प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे, ही समाधानाची बाब आहे. महाराष्ट्र आज देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आर्थिक बाबतीत मागे असेलही पण बौद्धिक, वैचारिक तसेच पुरोगामित्वाच्या दृष्टीने विचार केला तर महाराष्ट्र निश्चितच पुढे आहे, असाही मुद्दा तरुणांनी मांडला.

महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती व्हावी -
विकासाच्या बाजूने विचार केला तर आज महाराष्ट्राची वाटचाल सकारात्मक आहे. शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेले केरळ, औद्योगिकीकरणात पहिल्या क्रमांकावर असलेल्या गुजरात राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र काहीसा पिछाडीवर आहे. त्यामुळे महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती व्हावी, अशी अपेक्षा देखील तरुणांनी व्यक्त केली.

Intro:जळगाव
1 मे 1960 रोजी स्वतंत्र घटक राज्य म्हणून उदयास आलेल्या महाराष्ट्राने आज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे. गेल्या 59 वर्षात महाराष्ट्रात सामाजिक, आर्थिक तसेच पुरोगामित्वाच्या दृष्टिकोनातून अनेक घडामोडी घडल्या. महाराष्ट्राने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. या देशाला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या महाराष्ट्राने आपली मराठी अस्मिता जोपासली आहे, आणि मराठी अस्मिता हेच महाराष्ट्राचे खरे वेगळेपण आहे, असे मत जळगावातील तरुणाईने व्यक्त केले आहे.

Body:महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला 'ई-टीव्ही भारत'ने जळगावातील तरुणाईचे महाराष्ट्राविषयीचे मत जाणून घेतले. महाराष्ट्राची स्थापनेपासून ते आता पर्यंतची वाटचाल, तरुणाईला अभिप्रेत असलेली महाराष्ट्राची प्रगती या बाबींचा उलगडा यानिमित्ताने झाला.

मराठी संस्कृती ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला त्याचा सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सारख्या महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्राची भूमी पावन झालेली आहे. त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांच्यासारख्या थोर संतांमुळे महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची बीजे रोवली गेली. आजही त्यांचा वारसा महाराष्ट्र जपत आहे आणि पुढेही जपत राहील, असेही यावेळी तरुणांनी सांगितले.

Conclusion:स्थापनेपासून ते आता पर्यंतच्या वाटचालीत महाराष्ट्रात विविध क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या. संविधानाचे रचयेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सी.डी. देशमुख असतील महाराष्ट्राने या देशाला मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राने आज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात प्रगती केली असली तरी आजही आपल्या महाराष्ट्रासमोर सामाजिक, आर्थिक तसेच शेतकऱ्यांचे आणि युवकांच्या रोजगाराचे काही प्रश्न आहेतच. या प्रश्नांची उत्तरं शोधताना महाराष्ट्राची निरंतर प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे, ही समाधानाची बाब आहे. महाराष्ट्र आज देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आर्थिक बाबतीत मागे असेलही पण बौद्धिक, वैचारिक तसेच पुरोगामित्वाच्या दृष्टीने विचार केला तर महाराष्ट्र निश्चितच पुढे आहे, असाही मुद्दा तरुणांनी मांडला.

महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती व्हावी-

विकासाच्या बाजूने विचार केला तर आज महाराष्ट्राची वाटचाल सकारात्मक आहे. शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेले केरळ, औद्योगिकीकरणात पहिल्या क्रमांकावर असलेल्या गुजरात राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र काहीसा पिछाडीवर आहे. त्यामुळे महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती व्हावी, अशी अपेक्षा देखील तरुणांनी व्यक्त केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.