ETV Bharat / state

जळगावच्या नाशिराबादेत ३ चिमुकल्यांचा बुडून मृत्यू; गावावर शोककळा

नशिराबाद येथील भवानीनगरमधील रहिवासी असलेले मोहित दिलीप नाथ (१२), आकाश विजय जाधव (१३) आणि ओम सुनील महाजन (११) हे तिघेही आज दुपारी वाघूर धरणावर पोहायला गेले होते. धरणाजवळील सुभाष वाणी यांच्या शेताजवळ असलेल्‍या पाटाच्या पुलाच्या चारीत पाण्यात ते पोहण्यास उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही.

जळगावच्या नाशिराबादेत ३ चिमुकल्यांचा बुडून मृत्यू; गावावर शोककळा
जळगावच्या नाशिराबादेत ३ चिमुकल्यांचा बुडून मृत्यू; गावावर शोककळा
author img

By

Published : Sep 29, 2020, 1:57 AM IST

जळगाव - नशिराबादजवळील वाघूर धरणाच्या पाटाच्या चारीतून वाहणाऱ्या पाण्यात तीन चिमुकले पोहण्यासाठी गेले असता वाहून गेल्‍याची घटना घडली. पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे जण बुडाल्‍याचा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. गेल्‍या आठवडाभऱ्यापूर्वी जिल्‍ह्यात दमदार पाऊस झाला. यामुळे सर्वच नदी, नाल्‍यांमधून अजूनदेखील पाणी वाहत आहे. पुराचे पाणी पाहण्यासाठी अनेक जण नदीवर जात असतात. शिवाय, या वाहत्‍या पाण्यात पोहण्याचा आनंददेखील घेत आहेत. दरम्‍यान, वाघूर धरणही पूर्णपणे भरले असल्यामुळे अनेक जण फिरण्यास व पोहायला जातात.

नशिराबाद येथील भवानीनगरमधील रहिवासी असलेले मोहित दिलीप नाथ (१२), आकाश विजय जाधव (१३) आणि ओम सुनील महाजन (११) हे तिघेही आज दुपारी वाघूर धरणावर पोहायला गेले होते. धरणाजवळील सुभाष वाणी यांच्या शेताजवळ असलेल्‍या पाटाच्या पुलाच्या चारीत पाण्यात ते पोहण्यास उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते गटांगळ्या खाऊ लागले. पाण्याचा प्रवाह अधिक असल्‍याने तिघांनाही बाहेर निघता आले नाही. सदर घटनेची माहिती जवळ असणाऱ्या लोकांनी पोलिसांना व ग्रामस्थांना दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस घटनास्थळी पोहोचले.

पाण्यात बुडाल्‍यानंतर त्‍यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. यात सर्वात प्रथम मोहितचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर वाहून जात असताना आकाश व ओम यांचे मृतदेह मिळाले. तिघांचेही मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले होते. यावेळी एपीआय प्रवीण साळुंखे, सचिन कापडणीस, हवालदार प्रवीण ढाके, पोना रवींद्र इंधाटे यांनी धाव घेतली होती. सोपान विठोबा वाणी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.