ETV Bharat / state

जुन्या वादातून प्रौढाचा दगडाने ठेचून खून, अवघ्या सहा तासात तीन संशयित अटकेत

पोलिसांनी केलेल्या चौकशीत तुषार खळ्यात रखवालीसाठी गेला होता, तर वसंत धनगर यांचे वाघूर धरणाजवळ घर आहे. रात्री साडेआठ वाजेपर्यंतच आपण सोबत होतो, असे त्यांनी तपासात सांगितले. मृत सुर्वे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

jalgaon police
जळगाव पोलीस
author img

By

Published : May 29, 2020, 7:48 AM IST

जळगाव - जुन्या वादातून जळगाव तालुक्यातील कंडारी येथील तुषार प्रभाकर सुर्वे (वय ४१, रा. कंडारी) या प्रौढाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने दुपारी १२ वाजता गावातीलच तीन तरुणांना ताब्यात घेतले. या तरुणांनी खुनाची कबुली दिली आहे. विशाल देविदास मराठे (वय २२), राहुल नरेंद्र जाधव (वय १९) व गाेपाळ दिलीप भुसारी (वय २२, तिघे रा. कंडारी) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

बुधवारी रात्री रायपूर येथील उपसरपंच वसंत सीताराम धनगर व तुषार सुर्वे या दोघांनी खळ्यात मद्यप्राशन केले होते. त्यानंतर वसंत धनगर हे तेथून निघून गेले होते. यानंतर रात्री नऊ वाजता विशाल, राहुल व गोपाळ हे तिघे सुर्वे यांच्या खळ्यात पोहोचले. सुर्वे व राहुल यांच्यात नेहमीच वाद होत असे. याच जुन्या वादातून रात्री पुन्हा एकदा त्यांच्यात भांडण झाले. यावेळी राहुलने सुर्वे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना ठार केले. तर गोपाळ व विशाल यांनी देखील सुर्वेंना मारहाण केली होती. सुर्वेंचा खुन केल्यानंतर तिघे जण गावात आले होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी सहा वाजता प्रल्हादराव शिवाजी देशमुख यांना सुर्वे यांचा मृतदेह खळ्यातील पलंगावर आढळून आला. त्यांनी तुषार सुर्वेंच्या पत्नी मनिषा यांना ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक प्रवीण साळुंखे, सचिन कापडणीस, विजयसिंग पाटील, नरेंद्र वारुळे, दर्शन ढाकणे, प्रवीण ढाके, सतीश पाटील, राजू सोळंखे व किरण बाविस्कर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत तुषार खळ्यात रखवालीसाठी गेला होता, तर वसंत धनगर यांचे वाघूर धरणाजवळ घर आहे. रात्री साडेआठ वाजेपर्यंतच आपण सोबत होतो, असे त्यांनी तपासात सांगितले. मृत सुर्वे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृत सुर्वे यांच्या पश्चात पत्नी मनिषा, मुलगा ओम,वडील प्रभाकर भाऊराव सुर्वे, भाऊ हेमंत असा परिवार आहे.

खाक्या दाखवताच तिघांनी दिली खुनाची कबुली-

खुनाची घटना समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी दुपारी १२ वाजता राहुल, विशाल व गोपाळ या तिघांना संशयावरुन ताब्यात घेतले होते. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. जुन्या वादातूनच हा खून केल्याचे संशयितांनी कबुल केले आहे. अवघ्या सहा तासात पोलिसांनी या खून प्रकरणाचा उलगडा केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.