ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद ठरले पहिले लाभार्थी - Dr. Jaiprakash Ramanand news

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पहिली लस टोचून घेतली. कोरोना लसीकरण मोहिमेचे ते जिल्ह्यातील पहिले लाभार्थी ठरले.

Jalgaon
Jalgaon
author img

By

Published : Jan 16, 2021, 3:16 PM IST

Updated : Jan 16, 2021, 3:29 PM IST

जळगाव - जिल्ह्यात शनिवारी सकाळी 11च्या सुमारास बहुप्रतिक्षित कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशव्यापी मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पहिली लस टोचून घेतली. कोरोना लसीकरण मोहिमेचे ते जिल्ह्यातील पहिले लाभार्थी ठरले. त्यांच्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी लस घेतली.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

'असे' झाले लसीकरण

लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सर्वात पहिली लस घेण्यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची प्रतिक्षालयात स्क्रिनिंग करण्यात आली. त्यानंतर कोविन ‌अ‌ॅपमध्ये त्यांच्या नोंदणीची खात्री करून कागदपत्रे तपासण्यात आली. सर्व माहितीची चाचपणी केल्यानंतर त्यांना लसीकरण कक्षात अधिपरिचारिका कुमुद जवंजार यांनी कोविशिल्ड लस टोचली. त्यानंतर पुढील डोसची माहिती घेऊन डॉ. रामानंद निरीक्षण कक्षात दाखल झाले. त्याठिकाणी ते अर्धा तास थांबले. कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्याची खात्री झाल्यावर ते दैनंदिन कामावर गेले. त्यांच्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार, अधिपरिचारिका कविता नेतकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, शरीर रचनाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरुण कासोटे, अधिपरिचारिका जयश्री जोगी यांनी लस घेतली.

जिल्ह्यातील 7 केंद्रांवर लसीकरण

जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह, महापालिकेचे डी. बी. जैन हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा आणि जामनेर, ग्रामीण रुग्णालय, पारोळा व चाळीसगाव आणि भुसावळ नगरपालिकेच्या रुग्णालयात अशा 7 केंद्रांवर राबवण्यात येत आहे. या मोहिमेसाठी प्रति लसीकरण केंद्र 100 लाभार्थी, याप्रमाणे एकूण 700 आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी जळगाव जिल्ह्यासाठी एकूण 19 हजार 951 आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. त्यासाठी कोविशिल्ड या लसीचे 24 हजार 320 डोस (2432 Vial) जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत.

'कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरक्षित'

कोरोना लसीकरणाची प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आहे. मी आज स्वतः कोरोनाची लस घेतली. ही लस घेतल्यानंतर मला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. कोरोनाची लस ही वैद्यकीय तपासणीअंती अत्यंत सुरक्षित असल्याची खात्री पटली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.

'मंत्रिमंडळात ठराव करू'

आज देशभरात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाली. खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा सोनेरी दिवस आहे. कोरोनाच्या लसीकरणासाठी नागरिकांनी आता स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याची गरज आहे. पुढच्या टप्प्यात आपल्या राज्यासाठी लसीचे जास्तीत जास्त डोस मिळावेत, यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव करण्यात येईल, अशी माहिती या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

Last Updated : Jan 16, 2021, 3:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.