ETV Bharat / state

राज्य सरकारने 100 वारकऱ्यांना पायी वारीला जाऊ द्यावे, श्रीसंत मुक्ताई संस्थानच्या अध्यक्षांची मागणी

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने यावर्षी राज्य सरकारने आषाढी एकादशीच्या वारीसाठी 100 वारकऱ्यांना पंढरपूरला पायी जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी श्रीसंत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अ‌ॅड. रवींद्र पाटील यांनी केली.

author img

By

Published : Jun 10, 2021, 5:03 PM IST

foot walk wari demand Ravindra Patil Jalgaon
शंभर वारकरी पायी वारी मागणी

जळगाव - कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने यावर्षी राज्य सरकारने आषाढी एकादशीच्या वारीसाठी 100 वारकऱ्यांना पंढरपूरला पायी जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी श्रीसंत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अ‌ॅड. रवींद्र पाटील यांनी केली.

माहिती देताना मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष

हेही वाचा - चंद्रकांत पाटील कधीही ठाम नसतात, त्यांची मते दररोज बदलतात -एकनाथ खडसे यांनी काढला चिमटा

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्रीसंत मुक्ताईंचा पालखी सोहळा 14 जून रोजी प्रस्थान ठेवणार आहे. यावर्षी सुदैवाने वारी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीअंशी कमी झाला आहे. त्यामुळे, राज्य सरकारने आषाढीच्या वारीसाठी पालखी सोहळ्यासोबत 100 वारकऱ्यांना पायी चालत जाण्याची परवानगी दिली पाहिजे. समस्त वारकरी बांधव शिस्त पाळून पालखी सोहळ्यात सहभागी होतील, अशी विनंती श्रीसंत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी केली.

राज्यात सर्वात आधी निघते मुक्ताईंची पालखी

दरवर्षी आषाढी एकादशीच्या वारीसाठी मुक्ताईनगर येथून श्रीसंत मुक्ताई पालखी निघत असते. राज्यातील प्रमुख मानाच्या पालख्यांपैकी एक असलेली मुक्ताईंची पालखी ही राज्यात सर्वप्रथम प्रस्थान ठेवते. पुढे ही पालखी 750 किलोमीटर अंतर पार करून पंढरपूर येथे दाखल होते. या वारीसाठी तब्बल 34 दिवस लागत असतात. पंढरपूरजवळ वाखारी येथे मुक्ताईंच्या पालखीसोबत श्रीसंत तुकाराम, श्रीसंत ज्ञानेश्वर, श्रीसंत सोपानदेव यांच्या पालख्या भेटतात. नंतर पालख्या एकत्रितपणे पंढरपूरला दाखल होतात.

आम्ही शिस्तीचे पालन करू

जागतिक कोरोना महामारीचे भान ठेवून आम्ही शिस्तीचे पालन करू. राज्य सरकारप्रमाणे आमचीही जबाबदारी आहे, हे भान जपत आम्ही वारी पूर्ण करू. वारकरी संप्रदायाची वारीची परंपरा कायम रहावी, म्हणून राज्य सरकारने 2 दिवसांत आम्हाला सकारात्मक निर्णय द्यावा, अशी मागणी अॅड. रवींद्र पाटील यांनी केली.

हेही वाचा - जळगाव : अंगावर वीज पडून दोघांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.