ETV Bharat / state

दुचाकींना फाशी.. पाचोऱ्यात काँग्रेसकडून इंधन दरवाढीचा निषेध - इंधन दरवाढ, दुचाकीला फाशी

इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी पाचोरा तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी दुचाकींना प्रतिकात्मकरित्या फाशी देत काँग्रेसने इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. तसेच, इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असल्याचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी म्हटले आहे.

जळगाव
जळगाव
author img

By

Published : Jun 7, 2021, 3:29 PM IST

जळगाव - इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी पाचोरा तालुका काँग्रेसच्या वतीने सोमवारी (7 जून) लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. दुचाकींना प्रतिकात्मकरित्या फाशी देत काँग्रेसने इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. मोदी सरकारने इंधन दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पाचोरा शहरातील भडगाव रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

दुचाकीला फाशी देत इंधन दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध

'महागाईचा भडका, शेतकरी संकटात'

'केंद्रात सत्तारूढ असलेले मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी आहेत. तरीही इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल शंभरी पार झाले आहे. तर डिझेल शतकाच्या उंबरठ्यावर आहे. इंधनाचे दर वाढल्याने महागाई आपोआप वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. डिझेलचे दर वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती जास्त होत्या. तरीही इंधनाचे दर स्थिर होते. त्यावेळी विरोधात असलेले भाजप सरकार इंधन दरवाढीच्या नावाखाली गळा काढत होते. मात्र, आता त्यांना सर्वसामान्य जनतेचा विसर पडला आहे. केंद्र सरकारने इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी', अशी मागणी तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे.

हेही वाचा - शिर्डी साईमंदिर सुरू करा, अन्यथा आंदोलन; ग्रामस्थांचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.