ETV Bharat / state

अफगाणिस्तान संघर्षाचा फटका; निर्यात थांबल्याने जळगावातील शेकडो क्विंटल केळी पडून! - अफगाणिस्तान भारत निर्यात

अफगाणिस्तानातदेखील मोठ्या प्रमाणावर केळीची निर्यात पूर्वापार होत आहे. मात्र, सध्याच्या काळात अफगाणिस्तानमध्ये उद्भवलेल्या संकटामुळे केळीची निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे जळगावातील केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जळगावातील शेकडो क्विंटल केळी पडून
जळगावातील शेकडो क्विंटल केळी पडून
author img

By

Published : Aug 20, 2021, 5:18 PM IST

Updated : Aug 20, 2021, 5:27 PM IST

जळगाव - तालिबानींनी अफगाणिस्तान सरकारचा पाडाव केल्यानंतर जळगावातील केळी उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील शेकडो क्विंटल केळी अफगाणिस्तानमध्ये निर्यात केली जात होती. परंतु, ही निर्यात थांबल्याने जळगाव जिल्ह्यात तसेच काश्मीर सीमेवर केळीचे कंटेनर उभे आहेत. काही व्यापाऱ्यांनी सौदे रद्द केल्याने शेकडो क्विंटल केळी पडून आहेत.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट लागू झाली आहे. त्यामुळे तिकडे परिस्थिती हाताबाहेर जाऊन अराजकता निर्माण झाली आहे. या साऱ्या घडामोडींचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. अफगाणिस्तानात सध्या गंभीर परिस्थिती असल्याने भारतातून होणाऱ्या व्यापारावर परिणाम झाला आहे.

जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर जिल्ह्यातील शेकडो क्विंटल केळी अरब राष्ट्रांमध्ये निर्यात होते. अफगाणिस्तानातदेखील मोठ्या प्रमाणावर केळीची निर्यात पूर्वापार होत आहे. मात्र, सध्याच्या काळात अफगाणिस्तानमध्ये उद्भवलेल्या संकटामुळे केळीची निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे जळगावातील केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

हेही वाचा-काबूलमध्ये काय घडलं? अफगाणिस्तानातून भारतात सुखरूप परतलेल्या सविता शाही यांचा थरारक अनुभव

र्यात थांबल्याने जळगावातील शेकडो क्विंटल केळी पडून

काश्मीर सीमेवर अडकले कंटेनर-

जळगाव जिल्ह्यातून अफगाणिस्तानमध्ये दररोज शेकडो क्विंटल केळी निर्यात केली जात होती. मात्र, तिकडे परिस्थिती बिघडत गेल्याने ही निर्यात हळूहळू कमी होऊ लागली. अलीकडे तर केळी निर्यात पूर्णपणे बंद आहे. जिल्ह्यातील काही व्यापारी तसेच शेतकऱ्यांचे केळीचे कंटेनर काश्मीर सीमेवर अडकले आहेत. अफगाणिस्तानातील काही व्यापाऱ्यांनी केळीचे सौदे रद्द केले. तर काही व्यापारीच तालिबान्यांच्या अत्याचारांमुळे देश सोडून पळून गेले आहेत. अशा परिस्थितीत केळीचा व्यापार थांबला आहे. सीमेवर अडकलेली केळीबाबत लवकर निर्णय झाला नाही तर केळी मातीमोल होऊन उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे.

हेही वाचा-अफगाणिस्तान दुतावासासंदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाकडून 6 आठवड्यांची स्थगिती

स्थानिक बाजारातही कोसळले केळीचे दर-

तालिबान-अफगाणिस्तान संघर्षामुळे केळीच्या निर्यातीवर झालेल्या परिणामासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील केळी उत्पादक शेतकरी प्रशांत महाजन यांनी सांगितले की, सध्या जळगाव जिल्ह्यातून अफगाणिस्तानमध्ये होणारी केळीची निर्यात थांबली आहे. जिल्ह्यातून दररोज किमान 10 ते 15 कंटेनर केळीची (कंटेनर क्षमता 20 टन) विदेशात निर्यात होते. अफगाणिस्तानमध्येही शेकडो क्विंटल केळी इराणमार्गे निर्यात केली जाते. सध्या ही निर्यात बंद आहे. अफगाणिस्तानमध्ये निर्यात होणाऱ्या केळीला सध्या प्रतिक्विंटल 1400 ते 1450 रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळत होता. पण निर्यातच ठप्प असल्याने शेतकऱ्यांची केळी वाया जाण्याची भीती वाटत आहे. अफगाणिस्तानमध्ये जाणारी केळी स्थानिक बाजारात विक्रीसाठी नेण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय नाही. अशा परिस्थितीत स्थानिक बाजारात केळीची आवक वाढल्याने केळीचे दर कोसळले आहेत. केळीला 1200 ते 1250 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. स्थानिक बाजारात हीच परिस्थिती अजून काही दिवस कायम राहिली तर केळीचे दर अजून घसरतील, असेही प्रशांत महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा-ट्विटरकडून अफगाणिस्तानचे काळजीवाहू अध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांचे ट्विटर अकाउंट बंद

काही शेतकऱ्यांनी कापणी थांबवली-

अफगाणिस्तानमध्ये निर्यात होणाऱ्या केळीची मागणी नसल्याने काही व्यापाऱ्यांनी सौदे रद्द केले आहेत. दुसरीकडे, स्थानिक बाजारातही दर कमी झाल्याने केळीला उठाव नाही. अशा परिस्थितीत जळगावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळीची कापणी थांबवली आहे. आधीच चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. आता पुन्हा हे संकट उभे राहिल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. केंद्र सरकारने केळीच्या निर्यातीबाबत काही तरी तोडगा काढावा, केळीच्या स्थानिक बाजारातील दरांवर अंकुश ठेवावा, अशा प्रकारच्या मागण्या शेतकरी करत आहेत.

दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय -

भारतीय निर्यात संघटना फेडरेशनचे डॉ.अजय सहाय यांच्या मते, भारत व्यापाराच्या दृष्टीने अफगाणिस्तानचा सर्वात मोठा मित्र आहे. 2021 मध्ये निर्यात 835 मिलियन डॉलर होती. तर 510 मिलियन डॉलरची आयात आहे. आयात आणि निर्यातीव्यतिरिक्त भारताने अफगाणिस्तानातही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. ज्यामध्ये सुमारे 400 योजनांमध्ये 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे.

Last Updated : Aug 20, 2021, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.