ETV Bharat / state

धक्कादायक! जळगावात मंगळवारी कोरोनाचे 10 बळी; 144 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

author img

By

Published : Jun 30, 2020, 9:14 PM IST

मंगळवारी जिल्ह्यात कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे, जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 244 इतकी झाली आहे. जिल्हा प्रशासनाला मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये सर्वाधिक 24 रुग्ण हे जळगाव शहरात आढळले आहेत.

जळगावात एकाच दिवशी कोरोनाचे 10 बळी
जळगावात एकाच दिवशी कोरोनाचे 10 बळी

जळगाव - जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वेग कायम आहे. मंगळवारी रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 144 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजार 582 इतकी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मंगळवारी एकाच दिवशी कोरोनामुळे तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची एकूण संख्या आता 244 इतकी झाली आहे.

मंगळवारचा दिवस जळगावकरांची चिंता वाढवणारा ठरला. मंगळवारी एकाच दिवसात तब्बल 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात 4 जणांचे मृत्यू हे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच कोविड रुग्णालयात, 5 जणांचे मृत्यू सरकारने अधिग्रहित केलेल्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये तर एकाचा मृत्यू हा शहरातील गणपती रुग्णालयात झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये जामनेर शहरातील 65 वर्षीय दोन वृद्धा आणि 50 वर्षीय पुरुष, जळगावातील 55 वर्षीय पुरुष, भुसावळातील 50 वर्षीय पुरुषासह 66 वर्षीय वृद्ध, यावलमधील 58 वर्षीय महिला आणि 40 वर्षीय पुरुष, धरणगावातील 85 वर्षीय वृद्धा तसेच एरंडोलमधील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

आता जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 244 इतकी झाली आहे. जिल्हा प्रशासनाला मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये सर्वाधिक 24 रुग्ण हे जळगाव शहरात आढळले आहेत.

कोरोना अपडेट -

जळगाव शहर 752
जळगाव ग्रामीण 119
अमळनेर 319
भुसावळ 419
भडगाव 228
बोदवड 60
चाळीसगाव 44
चोपडा 243
धरणगाव 158
एरंडोल 155
जामनेर 190
मुक्ताईनगर 39
पाचोरा 91
पारोळा 223
रावेर 258
एकूण 3582

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.