ETV Bharat / state

विश्वासघातकी भाजपला ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये धडा शिकवा; जळगावात शिवसेना कार्यकर्त्यांना सूचना - jalgaon news

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

शिवसेनेना जिल्हा बैठक
शिवसेनेना जिल्हा बैठक
author img

By

Published : Dec 25, 2020, 8:18 PM IST

जळगाव - राज्याच्या राजकारणात गेली 25 वर्षे आपण भाजपसोबत युतीधर्म पाळला. परंतु, जेव्हा काहीतरी देण्याची वेळ आली तेव्हा भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केला. आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये या विश्वासघातकी भाजपला धडा शिकवा, अशा सूचना शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केल्या. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक ही पक्ष विरहित मानली जात असली तरी जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे, असेही नेत्यांनी सुचवले.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता सोनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेवक नितीन बरडे, प्रशांत नाईक, अनंत जोशी आदी उपस्थित होते.

संपर्क प्रमुख संजय सावंत
ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करा- गुलाबराव पाटील
बैठकीत मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना क्रमांक एकचा पक्ष आहे. येणारा खासदार शिवसेनेचा असेल एवढी ताकद आपली आहे, हे आकड्यांवर सांगू शकतो. रावेर लोकसभा मतदारसंघातही आपले दोन आमदार आहेत. ग्रामपंचायत निवडणुका कशा लढायच्या, हे सांगायची शिवसैनिकाला गरज नाही. म्हणूनच वर्षानुवर्षे पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर आपले प्रतिनिधी प्रतिनिधित्व करत आहेत. ग्रामपंचायत निवडणूक जास्तीत जास्त बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करा. पुढे जाऊन जिल्हा परिषदेची निवडणूक होईल, त्यात आपल्या ताकदीचा फायदा होईल. ग्रामपंचायत निवडणूक ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तसेच पक्षाच्या ताकद वाढीची रंगीत तालीम आहे, असे मानून चाला. पुढची जिल्हा परिषद महाविकास आघाडीच्या ताब्यात असेल, असा दावाही गुलाबराव पाटील यांनी केला.
सरकारचे काम जनतेपर्यंत पोहचवा- चिमणराव पाटील
ग्रामपंचायत निवडणूक खूप महत्वाची असते. म्हणून कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. शिवसेना हा कार्यकर्त्यांचे मत जाणून घेणारा पक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतूनच कार्यकर्ते उद्याचे नेते घडत असतात. ग्रामपंचायत ही सक्षम संस्था असते. तिच्या माध्यमातून जनतेची कामे, ग्रामीण भागातील विकास आपण करू शकतो. सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राज व्यवस्था आणली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका वर्षात चांगले नाव कमावले आहे. त्यांच्या कार्याची दखल सर्वत्र घेतली जात आहे. आपल्या नेत्याच्या कामाची पद्धत लक्षात घेऊन आपणही जनसेवा केली पाहिजे. यापुढे आपल्याला पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत. म्हणून ग्रामपंचायतीवर सत्ता आणणे गरजेचे आहे. राजकारण हे समाजकारणासाठी असावे. पण आताची परिस्थिती पाहिली तर राजकारण हे स्वतःच्या फायद्यासाठी केले जात असल्याचे लक्षात येते. शिवसेना हा क्रमांक एकचा पक्ष राहिला पाहिजे, या दृष्टीने विचार करा. सरकार आपले आहे, मुख्यमंत्री आपले आहेत, याचा फायदा घ्या. ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवून आणा, असे आवाहन चिमणराव पाटील यांनी केले.
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा- किशोर पाटील
जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकेल, या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जरूर प्रयत्न करू. पण ज्याठिकाणी अडचणी आहेत, आपली ताकद कमी आहे. त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा. यावेळी सरपंचाचे आरक्षण निकालानंतर कळणार असल्याने 'ब्लाइंड गेम' खेळावा लागणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची सत्ता महत्वाची आहे. पालकमंत्री आपले आहेत. काही ठिकाणी आमदारही आपले आहेत. अशा परिस्थितीत आम्ही निधी कसा द्यायचा? हा प्रश्न असल्याने ग्रामपंचायतीत सत्ता आणणे गरजेचे आहे. आजवर आपण भाजपसोबत होतो. पण भाजपने आपला विश्वासघात केला आहे. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, असेच म्हणावे लागेल. आपला प्रमुख शत्रू भाजप आहे, हे लक्षात घ्या, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

विश्वासघात करणाऱ्यांशी आपला लढा- संजय सावंत

ग्रामपंचायतीची निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. ही निवडणूक पक्ष विरहित मानली जात असली तरी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवा. आता आपण महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. ज्यांच्याशी आपण अनेक वर्षे मैत्री केली, त्यांनी आपला विश्वासघात केला आहे. आता आपण आजवर विरोधक असलेल्या पक्षांसोबत आहोत. विश्वासघात करणाऱ्यांशी आपल्याला लढायचे आहे, असे संजय सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा- मुंबई महापालिकेच्या सर्व जागा लढवण्यासाठी काँग्रेस तयार - भाई जगताप

हेही वाचा- सत्तासुंदरी हातातून निसटल्यामुळे शेलार आणि दरेकर 'देवदास' झालेत- राजू शेट्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.