ETV Bharat / state

आदर्श शिक्षक किशोर पाटील-कुंझरकर यांचा संशयास्पद मृत्यू - Jalgaon teacher news

एरंडोल शहरापासून काही अंतरावर असलेल्या पळासदळ शिवारात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, किशोर पाटील यांचा घातपात झाल्याची शक्यता त्यांच्या कुटुंबीयांनी वर्तवली आहे.

किशोर पाटील
किशोर पाटील
author img

By

Published : Dec 9, 2020, 2:09 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील गालापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक किशोर पाटील-कुंझरकर यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. आज (बुधवारी) सकाळी त्यांचा मृतदेह एरंडोल शहरापासून काही अंतरावर असलेल्या पळासदळ शिवारात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, किशोर पाटील यांचा घातपात झाल्याची शक्यता त्यांच्या कुटुंबीयांनी वर्तवली आहे. त्यांचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात यावे, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे.

प्रश्न अनुत्तरीत

किशोर पाटील हे मूळचे चाळीसगाव तालुक्यातील कुंझर या गावचे रहिवासी होते. ते एरंडोल तालुक्यातील गालापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून सेवारत होते. त्यांच्या पत्नीही शिक्षिका आहेत. पाटील दाम्पत्य एरंडोल शहरातील आदर्श नगरात वास्तव्याला होते. दरम्यान, किशोर पाटील हे आज पळासदळ शिवारात मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? त्यांचा कुणी घातपात केला का? हे अनुत्तरीत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पाटील यांचा मृतदेह तातडीने रुग्णवाहिकेद्वारे एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

शिक्षक संघटनेत होते सक्रिय

किशोर पाटील हे शिक्षक संघटनेचे सक्रिय पदाधिकारी होते. शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांचा संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी नेहमी पाठपुरावा सुरू असायचा. त्यामुळे ते शिक्षण क्षेत्रात सर्वांना परिचित होते. ज्ञानदानासोबतच ते विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्वखर्चाने निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असत. त्यांच्या सेवाभावी व उपक्रमशीलतेची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवले होते.

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना दिले शिक्षणाचे धडे

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्यभरातील शाळा बंद असताना किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन शिक्षणाचे धडे दिले होते. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या वतीने देखील असे उपक्रम राबविण्याच्या सूचना इतर उपक्रमशील शिक्षकांना केल्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.